गोरेगाव- मुलुंड जोडरस्त्याने बाधित होणारी 180 बांधकामे एस विभागाने हटवली

मुंबईतील पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून वाहतुकीवरचा भार कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या गोरेगाव- मुलुंड जोडरस्त्याने बाधित होणारी 180 बांधकामे हटविण्याची कारवाई महापालिकेच्या एस विभागाच्या वतीने करण्यात आली.

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबईतील पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून वाहतुकीवरचा भार कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणा-या गोरेगाव - मुलुंड जोडरस्त्याने बाधित होणारी १८० बांधकामे हटविण्याची कारवाई महापालिकेच्या एस विभागाच्या वतीने ९ ऑक्‍टोबर २०२६ रोजी करण्यात आली. खिंडीपाडा सोनापूर या टप्प्यात ही कारवाई करण्यात आली. त्‍यामुळे एस विभागाच्या हद्दीतील गोरेगाव - मुलुंड जोडरस्त्याचा मार्ग आता जवळपास मोकळा झाला आहे.






गोरेगाव - मुलुंड जोड रस्त्याची लांबी १२.२० किलोमीटर आहे. या जोडरस्त्याचे काम चार टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यात रस्ता, भूमिगत बोगदा, उड्डाणपूल आदी कामाचा समावेश आहे. एस विभागाच्या हद्दीतील खिंडीपाडा सोनापूर येथील सुमारे १८० बांधकामे जोडमार्गाच्या उभारणीमुळे बाधित होणार होती. या बांधकामांवर शुक्रवारी कारवाई करण्यात आली आहे.


उप आयुक्त (परिमंडळ ६) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एस विभागाच्‍या सहायक आयुक्त यांच्‍या नेतृत्‍वाखाली ही मोहीम राबविण्‍यात आली. महानगरपालिकेचे ३० पेक्षा अधिक अभियंते, १०० कर्मचारी यांच्या सोबत ४ पोकलेन संयंत्र, ४ जेसीबी संयंत्र, १० डंपर आदींच्या सहाय्याने ही सर्व बांधकामे हटविण्याची कारवाई करण्यात आली. ९० पोलीस कर्मचारी यावेळी तैनात होते.






महापालिका एस विभागाच्या हद्दीतील गोरेगाव - मुलुंड जोड रस्त्याने बाधित होणारी जवळपास सर्वच बांधकामे आता हटवण्यात आली आहे. यामुळे गोरेगाव - मुलुंड जोडरस्त्याच्या रूंदीकरणाला सुरूवात करणे शक्य होईल. सर्व निर्धारित अडथळे दूर करून रस्ता रुंदीकरण व प्रकल्पाच्या पुढील कामांसाठी मार्ग मोकळा करण्‍यात आला आहे. अतिक्रमणांचे निष्कासन पूर्ण झाले असून, सध्या बांधकामाचा राडारोडा हटविण्याचे काम सुरू आहे. राडारोडा हटविल्यानंतर प्रकल्पाच्या पुढील कामांसाठी जागा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहे. प्रकल्‍पबाधितांपैकी पात्र १०८ रहिवाशांचे महानगरपालिकेच्‍या वतीने पुनर्वसन करण्‍यात आले आहे.

Comments
Add Comment

Central Railway Block : पनवेल - कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामासाठी मध्य रेल्वेचा विशेष ब्लॉक; काही एक्स्प्रेस गाड्या उशिरा धावणार

पनवेल येथे सुरू असलेल्या कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामासाठी मध्य रेल्वेने २९ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान

Sunday Mega Block : रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; मध्य आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकात बदल

मुंबई : मुंबईकरांनो, रविवारी (29 नोव्हेंबर) लोकलने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर रेल्वेचे वेळापत्रक आधी तपासा.

Western Railway : पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री चार तासांचा जम्बो ब्लॉक; सांताक्रूझ-माहीमदरम्यान फास्ट लोकल धीम्या मार्गावर

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर मुंबईत 'आदर्श दुय्यम निबंधक' कार्यालय

मुंबई : पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर राज्यात प्रायोगिक तत्त्वावर उभारण्यात आलेले पहिले आदर्श सह दुय्यम

Devendra Fadnavis: वसई-विरार, कर्जतला गेलेल्या गिरणी कामगारांना पुन्हा मुंबईत आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

मुंबई : पूर्वीच्या धोरणांमुळे दक्षिण मुंबईतून वसई, विरार आणि कर्जतपर्यंत स्थलांतरित व्हावे लागलेल्या गिरणी

बँकेमध्ये नोकरीची संधी, अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेमध्ये वाढ; 837 पदांसाठी केली जातेय नोकरभरती

मुंबई: बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. वेल्थ मॅनेजमेंट पदासाठी 'बँक ऑफ