मुंबई: विधानपरिषद निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी न मिळालेल्या भाजपचे नेते शरद लाड यांची पक्षाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या नियुक्तीची घोषणा केली असून, ती तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.
मुंबई: लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये रोहित पवार सुद्धा आहेत. रोहित पवार यांचे MPSC ...
पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपने डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी दिल्याने शरद लाड यांना विधानपरिषदेत जाण्याची संधी मिळाली नव्हती. या निर्णयानंतर लाड यांनी आपली भूमिका स्पष्ट करत पक्षाच्या निर्णयाबाबत कोणतीही नाराजी नसल्याचे सांगितले होते. पक्षाने उमेदवारी निश्चित करताना आपल्याला विश्वासात घेतले असून, पक्षहिताच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयाचे आपण स्वागत करतो, असे त्यांनी म्हटले होते.
महाखनिज २.० प्रणालीतील तांत्रिक अडथळे तातडीने दूर करा. पोर्टल संथ होणे, वारंवार एरर येणे किंवा प्रणालीतील अडचणींमुळे नागरिकांची गैरसोय होता कामा नये. ...
तसेच, महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी आपण आणि आपले सहकारी पूर्ण ताकदीने प्रयत्न करू, अशी भूमिकाही लाड यांनी मांडली होती. पक्षासाठी केलेल्या कामाचा आणि योगदानाचा विचार भविष्यात पक्षश्रेष्ठी करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर लाड यांच्याकडे प्रदेश सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.