कलशाच्या आत काय टाकावं?
कलश स्थापन करताना त्यात साधं शुद्ध जल भरावं.त्यात थोडं गंगाजल मिसळावं. तसेच आपला हात त्या कळशावर ठेवून 'गंगेच यमुने चैव गोदावरि सरस्वति। नर्मदे सिन्धु कावेरि जलेऽस्मिन् संनिधिं कुरु॥' या मंत्राचा जप करावा. सात पवित्र नद्यांचा त्यात वास आहे, अशी भावना मनात ठेवावी. त्यानंतर त्यात अक्षता टाकाव्यात. त्यानंतर देवीला प्रिय असलेलं फुल अर्पित करावं. समृद्धीचं प्रतीक म्हणून त्यात एक नाणं टाकावं. शेवटी हळकुंड किंवा चिमुटभर हळद टाकावी. या सर्व गोष्टी कळशात टाकाल्यानंतर त्याचं पावित्र्य अनेक पटीने वाढतं. पूजेवेळी या कळशाची पूजा केल्याने त्याचा प्रभाव वाढतो, असं ज्योतिषशास्त्र सांगतं.
[caption id="attachment_1065035" align="aligncenter" width="800"] शनिची साडेसाती असली की सावधपणे पावलं टाकावी, असा सल्ला ज्योतिष देतात. या कालावधीत व्यक्तीला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागू ...
कलशावर श्रीफळ ठेवा
हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात श्रीफळ वाढून केली जाते. त्यामुळे श्रीफळाचं महत्त्व अधिक आहे. नारळाला श्रीफळ संबोधलं जातं. त्याचा थेट संबंध देवी लक्ष्मीशी जोडला जातो. नारळ हा बाहेरून टणक आणि आतून मऊ असतो. त्या पद्धतीनेच आपल्यातील अहंकार जावा आणि नम्र भाव यावा अशी भावना असते. नारळाचा पांढरा अंतर्भाग आपल्या सत्यतेचे प्रतीक मानलं जातं. तसेच श्रीफळावरीस तीन डोळे हे ब्रह्मा, विष्णु आणि महेश प्रतीक आहे. त्यामुळे श्रीफळाचं महत्त्व पूजेत अधोरेखित होतं.
कलशातील शुद्ध जल नकारात्मक उर्जा दूर करते. तसेच आतील अक्षता, पुष्प, नाणं आणि हळकुंड यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते. तर कलशावरील श्रीफळ देत देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे. त्यामुळे आर्थिक स्थैर्य लाभते. तर श्रीफळावरी तीन डोळ्यांमुळे ब्रह्मा, विष्णु आणि महेशाचा आशीर्वाद लाभतो.