मध्य अमेरिकेतील पनामा देशाच्या किनारपट्टीवर शुक्रवारी रात्री एक अत्यंत भयानक नैसर्गिक आपत्ती ओढवली. रिश्टर स्केलवर ७.७ इतकी प्रचंड तीव्रता नोंदवलेला एक महाभयंकर भूकंप भूगर्भात झाला. या अज्ञानातून आणि तीव्र धक्क्यानंतर संपूर्ण अमेरिका खंडात खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या दूतावासाने तात्काळ पावले उचलत मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील तब्बल नऊ देशांसाठी त्सुनामीचा मोठा इशारा जारी केला आहे, ज्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
जमिनीखाली १० किमी खोल बसला हादरा
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (NCS) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर दिलेल्या माहितीनुसार, हा शक्तिशाली भूकंप ९ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजून २६ मिनिटांनी (भारतीय वेळेनुसार) झाला. या भूकंपाचे केंद्र जमिनीखाली अगदी १० किलोमीटर एवढ्या कमी खोलीवर होते, ज्यामुळे त्याचे हादरे अधिक तीव्रतेने जाणवले. पनामाची राजधानी पनामा सिटीपासून हे केंद्र सुमारे २०६ किलोमीटर नैऋत्य दिशेला समुद्रात होते, तर स्थानिक वेळेनुसार रात्री १२:५६ वाजता ला पिटालोझा भागात याचा मुख्य सुळका बसला.
९ देशांच्या किनाऱ्यांवर त्सुनामीचे सावट
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील गाळ काढून त्यातील पाणलोट क्षेत्र वाढवणे हे आवश्यक आहे. मात्र, या धरणांमधील गाळ हा ...
अमेरिकन त्सुनामी इशारा यंत्रणेने या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. भूकंपाच्या प्रचंड तीव्रतेमुळे समुद्रात महाकाय लाटा उसळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. या धोक्याच्या छायेत कोस्टा रिका, एल साल्व्हाडोर, पेरू, मेक्सिको, ग्वाटेमाला, पनामा, निकारागुआ, कोलंबिया आणि इक्वेडोर हे नऊ देश असून, या सर्व देशांच्या किनारपट्टीवरील प्रशासनाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
समुद्रकिनाऱ्यांवर धोकादायक आणि वेड्यावाकड्या लाटांचा मारा
दूतावासाने जारी केलेल्या सतर्कतेच्या सूचनेनुसार, किनारपट्टीच्या भागात समुद्राच्या पाण्याची पातळी अचानक वाढू शकते आणि अत्यंत धोकादायक, अनपेक्षित पाण्याचे प्रवाह उसळू शकतात. त्यामुळे समुद्राच्या आसपास फिरणाऱ्या नागरिकांना आणि पर्यटकांना तात्काळ किनाऱ्यांपासून लांब राहण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत. तसेच, ज्या लोकांची घरे किंवा इमारती समुद्राच्या अगदी जवळ आहेत, त्यांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्वरित उंच सुरक्षित टेकड्यांवर किंवा स्थलांतरित केंद्रांवर निघून जावे, असे सांगण्यात आले आहे.
विनाशाकारी आफ्टरशॉक्स आणि वीज खंडित होण्याची शक्यता
या मुख्य भूकंपापाठोपाठ आणखी काही शक्तिशाली 'आफ्टरशॉक्स' (धक्के) येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे, जे आधीच कमकुवत झालेल्या इमारतींना जमीनदोस्त करू शकतात. याशिवाय, आपत्तीमुळे विजा आणि दळणवळणाची साधने (मोबाईल नेटवर्क, वीज पुरवठा) पूर्णपणे कोलमडण्याची भीती आहे. या कठीण प्रसंगात नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि अधिकृत आपत्कालीन घोषणांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.