Mumbai Water Supply : धरणातील गाळ काढण्याची गरज... प्रशासनाने दिलेला अभिप्राय स्थायी समितीने परत पाठवला

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा क्षमता घटल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. प्रशासनाचा अभिप्राय समाधानकारक नसल्याने स्थायी समितीने तो फेरविचारासाठी परत पाठवला.

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील गाळ काढून त्यातील पाणलोट क्षेत्र वाढवणे हे आवश्यक आहे. मात्र, या धरणांमधील गाळ हा वर्षाला केवळ 0.2 पेक्षाही कमी असल्याचे उत्तर घाईघाईत प्रशासनाच्यावतीने देण्यात आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात पाण्याचे बुडीत क्षेत्र वाढवून काही त्यातील पाणी साठा वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे धरणांमधील गाळ काढण्याची आज गरज असून प्रशासनाकडून याबाबत सकारात्मक पाऊल उचलणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाकडून योग्य उत्तर न आल्याने आयुक्तांकडून देण्यात आलेला अभिप्राय परत फेरविचारासाठी स्थायी समितीने पाठवला आहे.


केंद्रीय जल आयोग (सीडब्ल्यूसी) यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) यांची नियुक्ती महानगरपालिकेच्या तलावातील गाळ सर्वेक्षणासाठी केली होती. यासंस्थे मार्फत विहार तलावाचे गाळ सर्वेक्षण सुदूर संवेदन तंत्राने आणि तुळशी धरणाचे गाळ सर्वेक्षण पूर्ण करण्यात येऊन गाळ सर्वेक्षणाअंती मे 2024 मध्ये पाणी साठवण क्षमतेत अनुक्रमे 16.42 टक्के व 14.98 टक्के घट निदर्शनास आली आहे. तानसा धरणाचे गाळ सर्वेक्षण सुदूर संवेदन तंत्राने ऑगस्ट 2022 मध्ये करण्यात आले व पाणी साठवण क्षमतेत 15.023 टक्के घट, मोडक सागर गाळ धरणाचे सर्वेक्षण ऑगस्ट 2023 मध्ये पूर्ण करण्यात येऊन पाणी साठवण क्षमतेत 8.986 टक्के घट व मध्य वैतरणा धरणाचे गाळ सर्वेक्षण फेब्रुवारी 2023 मध्ये सुदूर संवेदन तंत्राने करण्यात आले असून पाणी साठवण क्षमतेत 1.709 टक्के घट झालेली दिसून येते. म्हणजेच उपरोक्त धरणांसाठी अनुक्रमे 0.100 टक्के, 0.104 टक्के, 0.116 टक्के, 0.128 टक्के व 0.244 टक्के दराने वार्षिक घट झाली आहे असा अभिप्राय प्रशासनाने प्रभाकर शिंदे यांनी मांडलेल्या ठरावाच्या सूचनेवर दिला आहे.



याबाबतचा प्रस्ताव आला असता उबाठाचे यशोधर फणसे यांनी हा प्रशासनाने याचे उत्तर घाईघाईत आणल्याचे सांगितले. स्थायी समितीमध्ये विहार व तुळशीतील गाळ काढण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे शासनाने ज्या सात धरणांमधील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे ते पूर्ण झाल्यानंतर आपल्या धरणांमधील गाळ काढण्याचा विचार होवू शकतो. किमान हा गाळ काढल्यामुळे किमान 400 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करू शकतो. तर उबाठाच्या श्रध्दा जाधव यांनी पिसे पांजरापोळे येथील जलशुध्दीकरण प्रक्रियेतून वाया जाणाऱ्या 60 दशलक्ष लिटर पाण्यावर पुन्हा प्रक्रिया केली जाते आणि त्यातून 40 दशलक्ष लिटर पाणी मिळते. मग अशाचप्रकारचा प्रकल्प भांडुप संकुलातील जलशुध्दीकरण प्रक्रिया केंद्राच्या ठिकाणी राबवला जावा अशी सूचना केली.


गाळ काढण्यासाठी जापनीझ तंत्रज्ञानाचा वापर केला जावा अशी सूचना एमआयएमचे जमीर कुरेशी यांनी केली. तर भाजपच्या शीतल गंभीर यांनी गळती व चोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी काय कारवाई केली याचा अहवाल समितीच्या पटलावर ठेवण्यात यावा अशी सूचना केली. तर धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवनद्वारे अनेक लिटर पाणी वाया जाते. किमान चार दिवस पुरेल इतके जरी पाणी मिळाले तरी खूप होईल. मनसेेचे यशवंत किल्लेदार यांनी 50 वर्षे झालेल्या धरणांतील गाळ काढण्याचा विचार व्हावा अशी सूचना केली तर यासाठी सल्लागाराची निवड करणार का असा सवाल केला. अमेय घोले यांनी 50 वर्षे जुन्या धरणांमधील पाण्याचे आणि त्यातील गाळाचे मुल्यमापन केले जावे अशी सूचना केली तसेच सल्लागार निवडीचा लेखाजोखा मांडला जावा असे सांगितले. तुलिफ मिरांडा यांनी यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सल्लागार नेमण्याचा विचार केला जावा अशी सूचना केली. तर यामिनी जाधव यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सल्लागाराऐवजी आपल्याच अधिकाऱ्यांची मदत घेतली जावी अशी सूचना केली.

Comments
Add Comment

BMC News : सफाई कामगाराची भरती करण्याच्या नावाखाली कामगार संघटनांकडून लाखोंची पावती; सभागृहनेत्यांनी केला आरोप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत सफाई कामगारांना कायम सेवेत घेण्याचा प्रयत्न केला जात असून या

FDA Raids : अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई; 1 कोटींहून अधिकचा साठा जप्त, 13 जण अटकेत

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात प्रतिबंधित, निकृष्ट आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात मोठी मोहीम

गोरेगाव- मुलुंड जोडरस्त्याने बाधित होणारी 180 बांधकामे एस विभागाने हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून वाहतुकीवरचा भार कमी करण्यासाठी अत्यंत

बोरिवलीत कोस्टल रोड बाधित 30 बांधकामांवर बुलडोझर, BMC प्रशासनाची धडक कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई किनारा रस्‍ता (उत्‍तर) मार्गरेषेमुळे बाधित होणा-या बोरिवली येथील

मुंबईत पाणीकपात असताना रस्ते पाण्याने धुवायचे कसे? टँकरच्या पाण्याने रस्ते धुण्याचा प्रस्तावाला BMC चा विरोध

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत सध्या पाणीकपात कायम असताना आणि भविष्यातील पाण्याचे संकट असताना धुळीचे प्रदुषण

जलप्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचे मोठे पाऊल, पश्चिम उपनगरांत 5.8 किमी बोगद्याचे काम यशस्वी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) समुद्र व नदीच्या पाण्यात सोडण्यात येणाऱ्या मलजलाची गुणवत्ता सुधारून जल प्रदूषणाला आळा