भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री न्यायाच्या रणधुमाळीत आमने-सामने ! मराठी Zee 5 वर 'कोण यशवंत पानसरे'चा होणार प्रीमियर !

एखाद्या चक्रात अडकल्यावर मुक्तीचा शोध घेणाऱ्या व्यक्तीला त्याच व्यवस्थेचा सामना करण्यास भाग पाडले जाते; ज्यावरचा विश्वास त्याने एकदा गमावला होता. अशा स्थितीत नेमके काय घडते? आनंद दिलीप गोखले लिखित आणि दिग्दर्शित; मंजिरी सुबोध भावे यांच्या कान्हाज् मॅजिकची निर्मिती असलेली कोण यशवंत पानसरे? म्हणजे न्याय, सत्ता आणि सत्याशी संबंधित गुंतागुंतीच्या छेदनबिंदूचा शोध घेणारा हा एक खिळवून ठेवणारा कोर्टरूम ड्रामा तसेच एक तपास-आधारित थरारपट आहे.


समीक्षकांनी गौरवलेल्या तमिळ Zee5 सिरीजच्या 'सत्तामुम नीधियम' वरून रुपांतर केलेली ही मालिका एका व्यक्तीचा अपराधीभाव आणि आत्म-संशयावरुन धैर्य तसेच सुटकेच्या खोलवरील वैयक्तिक प्रवासाचा मागोवा घेताना आव्हानात्मक व्यवस्थेच्या परिणामांचा अभ्यास करते. भरत जाधव, शिवानी रांगोळे, पुष्कर श्रोत्री, शर्वरी जमेनीस, उज्ज्वला जोग, विद्याधर जोशी, मिलिंद फाटक यांच्या सहज अदाकारीने नटलेल्या ‘कोण यशवंत पानसरे?’ चा प्रीमियर दिनांक 16 ऑक्टोबर 2026 रोजी मराठी Zee 5 वर होणार आहे.


कोण यशवंत पानसरे ही मालिका नेमकी कशाबद्दल भाष्य करते?


एकेकाळी एक प्रबळ वकील असलेले यशवंत पानसरे हे आयुष्यात उद्ध्वस्त करणाऱ्या अपयशापायी नोटरी म्हणून काम करत असतात.ज्यामुळे ते अपराधीपणा आणि आत्म-संशयाच्या गर्तेत अडकले आहेत. त्यातच बेपत्ता झालेल्या अलकाचे वृद्ध वडील, सदाशिव मापारी हे मुलीचा छडा लावण्यात कुचकामी ठरलेल्या यंत्रणेवर आरोप करून न्यायालयाच्या बाहेर स्वतःला पेटवून घेतात. या घटनेमुळे यशवंत पानसरेंच्या आयुष्याला एक अनपेक्षित वळण लागते. या हताश कृतीमुळे हादरून गेलेले पानसरे न्यायालयात जनहित याचिका दाखल करतात. ज्यामध्ये पारंपरिक व्यावसायिक निकषांना आव्हान देणारी निर्भय तरुण वकील जान्हवी त्यांच्यासोबत लढाईत सामील होते.



तपासाशी निगडीत कोर्टरूम नाट्य- अलका बेपत्ता होण्यामागील पदर उलगडत असताना कथा कोर्टाच्या पलीकडे जाते. एक शक्तिशाली सुटका चक्रः पानसरे यांचा न्यायाचा पाठपुरावा हा त्यांच्या भूतकाळाला सामोरे जाण्याचा आणि वकील म्हणून त्यांची ओळख पुन्हा सिद्ध करण्याचा एक खोलवरील वैयक्तिक प्रवास बनतो. न्याय विरुद्ध सत्ता: ही मालिका उत्तरे शोधणारी व्यक्ती आणि शक्तिशाली संस्थात्मक त्याचप्रमाणे राजकीय शक्ती यांच्यातील संघर्षाचा शोध घेते. बदलत जाणारे प्रकरण: जनहित याचिकेचे रूपांतर हेबिअस कॉर्पस सुनावणीमध्ये होत असताना, प्रत्येक प्रकटीकरण प्रेक्षकांना सत्य परिस्थिती समजून घेण्याला आव्हान देते. संस्थात्मक अपयशाची किंमत मनुष्य चुकवतो: जेव्हा न्यायाच्या प्रतीक्षेत असलेली हतबल याचिका दुर्लक्षित राहते आणि एक माणूस व्यवस्थेला आव्हान देण्याचा निर्णय घेतो तेव्हा नेमके काय घडते याचा शोध कथानक मुळाशी जाऊन घेते. यापूर्वी कधीही न पाहिलेल्या थक्क करणाऱ्या दमदार स्वरुपाच्या यशवंत पानसरे’च्या भूमिकेत भरत जाधव यांनी व्यक्तिरेखेची खोली जाणून मोठ्या ताकदीने पात्राभोवतीची असुरक्षितता रंगवलेली पाहायला मिळते.

Comments
Add Comment

ब्लॉकबस्टर Drishyam 3, स्वत:चाच रेकॉर्ड मोडत अजय देवगणचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

मुंबई: अजय देवगणच्या 'दृश्यम 3'ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसत आहे. 2 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झालेला

Sai Paranjpye : ज्येष्ठ नाटककार सई परांजपे यांना यंदाचा मानाचा 'विष्णुदास भावे गौरव पदक' पुरस्कार जाहीर

सांगली : नाट्यशास्त्र आणि रंगभूमीच्या क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नाटककार, लेखिका व

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आठवणीने अमिताभ बच्चन भावुक; KBC च्या मंचावर व्यक्त केल्या भावना

Bollywood News: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यातील आदराचे नाते पुन्हा चर्चेत आले

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गुरूवारी पहाटे गोव्यामध्ये निधन झाले. गोव्यातील डोना पाऊलमधील राहत्या

Nana Patekar: निधनानंतरही चाहत्यांना नाना पाटेकर रुपेरी पडद्यावर पाहता येणार, कसं काय? ते जाणून घ्या

मुंबई: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या 75 व्या वर्षी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले

Nana Patekar Movie: नाना पाटेकरांच्या 'या' चित्रपटाचा आलेला हॉलिवूड रिमेक

हॉलिवूड मधील चित्रपटांचे बॉलिवूडमध्ये अनेक रिमेक झालेले आहेत. बॉलिवूडमधील काही चित्रपट हे हॉलिवूडच्या