BMC News : सफाई कामगाराची भरती करण्याच्या नावाखाली कामगार संघटनांकडून लाखोंची पावती; सभागृहनेत्यांनी केला आरोप

मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या भरतीवरून एक गंभीर आरोप समोर आला आहे. सफाई कामगारांची भरती करून देण्याच्या नावाखाली काही कामगार संघटनांकडून लाखोंच्या पावत्या दिल्या जात असल्याचा आरोप सभागृहनेत्यांनी केला आहे.

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत सफाई कामगारांना कायम सेवेत घेण्याचा प्रयत्न केला जात असून या कामगारांकडूनच आता विविध कामगार संघटना या सदस्य नोंदणीच्या नावाखाली एक लाख ते दीड लाख रुपये घेतले जात आहे. त्यामुळे काही कामगार हे आपले दागदागिने विकून कामगार संघटनांच्या पावत्या फाडत असल्याचा आरोप सभागृहनेते गणेश खणकर यांनी केला आहे.


मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी मागील 10 सप्टेंबर 2024 रोजी वारसा हक्काने अनुकंपा तत्वावर भरती करण्यात येणार आहे याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये स्वच्छतागृह आणि घाणी संबंधात काम करणाऱ्या कामगारांचा सामावेश करून त्यांना कामगाराच्या मुलांना तथा वारसांना अनुकंपा तत्वावर सामावून घेण्यासंदर्भात नियम जारी केला आहे. परंतु यामध्ये शव विच्छेदन, पशुवैद्यकीय विभाग, मलनि:सारण विभागाचाही समावेश आहे. परंतु यातील मलनि:सारण विभाग व शव विच्छेदन विभागाच्यावतीने याची अंमलबजावणी होत असून जोवर या दोन्ही विभागांमध्ये वारसा हक्काने कामगारांच्या नातेवाईकांना अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्यासंदर्भात अंमलबजावणी होत नाही तोवर हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्याची मागणी केली.


याला सभागृहनेते गणेश खणकर मुंबई महापालिकेतील अनेक विभागांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. ज्याठिकाणी कामगारांची पदे अनावश्यक आहेत तिथे भरती करू नका, पण जिथे आवश्यक आहेत तिथे तरी कामगारांची पदे भरा अशी मागणी त्यांनी केली. नवीन कचरा उचलणाऱ्या कामगारांना महापालिका सेवेत कायम घेण्यात येत आहे. परंतु या कामगारांकडून कामगार संघटना एक ते दीड लाख रुपयांची सदस्य नोंदणी म्हणून पावत्या फाडत आहे. यामध्ये एका महिलेने तर परिस्थिती नसताना दागिने विकून पैसे दिले आणि त्यानंतर आपले वय झाले असे सांगून त्यांना नोकरीवर घेता येणार नाही असे सांगितले. कामगार संघटनांनी आपले सदस्य वाढवावे, पण अशाप्रकारे फसवणूक करू नये असे सांगितले.



यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हरकतीचा मुद्दा राखून ठेवत राज्य शासनाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच कामगार संघटनांकडून अशाप्रकारे पावती फाडली जात असेल त्याकडे लक्ष दिले जावे आणि याचे उत्तर सादर केले जावे असे निर्देश दिले.

Comments
Add Comment

Mumbai Water Supply : धरणातील गाळ काढण्याची गरज... प्रशासनाने दिलेला अभिप्राय स्थायी समितीने परत पाठवला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील गाळ काढून त्यातील पाणलोट क्षेत्र वाढवणे हे

FDA Raids : अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई; 1 कोटींहून अधिकचा साठा जप्त, 13 जण अटकेत

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात प्रतिबंधित, निकृष्ट आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात मोठी मोहीम

गोरेगाव- मुलुंड जोडरस्त्याने बाधित होणारी 180 बांधकामे एस विभागाने हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून वाहतुकीवरचा भार कमी करण्यासाठी अत्यंत

बोरिवलीत कोस्टल रोड बाधित 30 बांधकामांवर बुलडोझर, BMC प्रशासनाची धडक कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई किनारा रस्‍ता (उत्‍तर) मार्गरेषेमुळे बाधित होणा-या बोरिवली येथील

मुंबईत पाणीकपात असताना रस्ते पाण्याने धुवायचे कसे? टँकरच्या पाण्याने रस्ते धुण्याचा प्रस्तावाला BMC चा विरोध

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत सध्या पाणीकपात कायम असताना आणि भविष्यातील पाण्याचे संकट असताना धुळीचे प्रदुषण

जलप्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचे मोठे पाऊल, पश्चिम उपनगरांत 5.8 किमी बोगद्याचे काम यशस्वी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) समुद्र व नदीच्या पाण्यात सोडण्यात येणाऱ्या मलजलाची गुणवत्ता सुधारून जल प्रदूषणाला आळा