Navratri 2026 : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीला दाखवा ‘या’ खास पांढऱ्याशुभ्र बर्फीचा नैवेद्य!

देवीला प्रसन्न करण्यासाठी भक्तगण विविध प्रकारच्या गोड पदार्थांचा आणि मिष्टान्नांचा नैवेद्य अर्पण करतात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची मनोभावे पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, माता शैलपुत्रीला तुपापासून बनवलेली पांढरीशुभ्र मिठाई अतिशय प्रिय आहे.

घरच्या घरी अवघ्या १५ मिनिटांत बनवा हलवाईसारखी मावा बर्फी!


पवित्र अशा नवरात्रोत्सवाला लवकरच सुरुवात होत आहे. या नऊ दिवसांच्या काळात माता दुर्गाच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात पूजा केली जाते. देवीला प्रसन्न करण्यासाठी भक्तगण विविध प्रकारच्या गोड पदार्थांचा आणि मिष्टान्नांचा नैवेद्य अर्पण करतात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची मनोभावे पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, माता शैलपुत्रीला तुपापासून बनवलेली पांढरीशुभ्र मिठाई अतिशय प्रिय आहे. त्यामुळे यंदाच्या पहिल्या दिवशी तुम्ही देवीला घरच्या घरी बनवलेली स्वादिष्ट खोया (मावा) बर्फीचा भोग आवर्जून दाखवू शकता. बाजारातून महगड्या मिठाई आणण्यापेक्षा घरच्या घरी अवघ्या १५ मिनिटांत ही बर्फी कशी बनवायची, याची सोपी रेसिपी खालीलप्रमाणे आहे:



मावा बर्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :



  • ताजा मावा

  • पिठीसाखर

  • शुद्ध तूप

  • वेलची पूड

  • सजावटीसाठी बारीक केलेले काजू, बदाम आणि चांदीचा वर्क


घरच्या घरी मावा बर्फी बनवण्याची सोपी पद्धत :


पायरी १ (मावा भाजून घेणे):


सर्वप्रथम एका कढईमध्ये ताजे खोया (मावा) घ्या आणि मध्यम आचेवर ५ ते ७ मिनिटे सतत चमचा हलवत चांगले परतून घ्या.


पायरी २ (साखर आणि तूप मिसळणे):


जेव्हा माव्याचा छान खमंग सुवास सुटू लागेल आणि तो कढईच्या कडा सोडायला लागेल, तेव्हा गॅसची आच एकदम मंद करा. त्यानंतर त्यात प्रमाणानुसार पिठीसाखर घालून चांगले एकत्र करा. साखर घातल्यानंतर मावा थोडा पातळ होईल, त्यानंतर त्यात थोडे शुद्ध देसी तूप घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.


पायरी ३ (मिश्रण घट्ट करणे):


जेव्हा हे संपूर्ण मिश्रण कढईत एकत्र येऊन कणकेच्या गोळ्यासारखे घट्ट होऊ लागेल, तेव्हा त्यात वेलची पूड घालून मिक्स करा आणि गॅस बंद करून टाका.


पायरी ४ (बर्फी सेट करणे आणि काप पाडणे):


तयार झालेले हे मिश्रण एका तुपाने ग्रीस केलेल्या (तूप लावलेल्या) ताटात किंवा ट्रेमध्ये काढा आणि वरून चमच्याने किंवा हाताने एकसारखे पसरवून घ्या. त्यावर बारीक केलेले काजू, बदाम आणि चांदीचा वर्क लावून हलक्या हाताने दाबून घ्या. आता हे मिश्रण १ ते २ तास पूर्णपणे थंड होण्यासाठी तसेच बाजूला ठेवून द्या. ताटात मिश्रण चांगले सेट झाल्यावर सुरीच्या सहाय्याने आवडीनुसार चौकोनी बर्फीच्या आकारात काप पाडून घ्या. सणाच्या दिवशी माता शैलपुत्रीला अर्पण करण्यासाठी तुमची अगदी हलवाईसारखी मऊ, पांढरीशुभ्र आणि स्वादिष्ट मावा बर्फी तयार आहे!

Comments
Add Comment

पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर मुंबईत 'आदर्श दुय्यम निबंधक' कार्यालय

मुंबई : पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर राज्यात प्रायोगिक तत्त्वावर उभारण्यात आलेले पहिले आदर्श सह दुय्यम

Fulwara Marathi Movie: 'फुलवरा'चा लावणीसाज! वैदेही परशुरामी आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या नव्या लूकची चर्चा

Fulwara Marathi Movie: रवी जाधव दिग्दर्शित आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या ‘फुलवरा’ या चित्रपटाची उत्सुकता आता

Tu Aahes Na: इफ्फीच्या मंचावर मराठी चित्रपटाची भावुक झलक! ‘तू आहेस ना’ला प्रेक्षकांचा प्रतिसाद

Tu Aahes Na: गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) येथे लव फिल्म्स फिल्म्सची

Mumbai Crime News : लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर 1.22 कोटींचे चरस जप्त; मुंबई पोलिसांकडून दोघांना अटक

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (एएनसी) वरळी युनिटने लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे

दक्षिणेत पावसाचा तडाखा, उत्तरेत दाट धुक्याचा कहर! हवामान विभागाचा खळबळजनक इशारा; 50 किमी ताशी वेगाने वारे वाहणार

नवी दिल्ली : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत असून, भारतीय हवामान विभागाने 27 नोव्हेंबर

ऑस्कर 2027 च्या शर्यतीत 2 भारतीय चित्रपट! 'गोंधळ' आणि 'अँग'ने मिळवली पात्रता

Oscars 2027 : भारतीय चित्रपट 'गोंधळ' आणि 'अंग' यांनी ऑस्कर 2027 च्या शर्यतीत प्रवेश केला आहे. 'गोंधळ'ला आंतरराष्ट्रीय फीचर