Saturday, October 10, 2026

शारदीय नवरात्रोस्तव २०२६ : नऊ दिवस, नऊ देवी, आणि शक्तीच्या उपासनेचा जागर

शारदीय नवरात्रोस्तव २०२६

मुंबई: हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा आणि श्रद्धेचा उत्सव म्हणून नवरात्री उत्सवाकडे पाहिले जाते. यंदा नवरात्रोस्तवयाची सुरवात ११ ऑक्टोबर पासून होत असून विजयादशमीचा चा शुभ मुहूर्तावर या सणाची सांगता होणार आहे. शारदीय नवरात्रोत्सवात देवीच्या शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या नऊ स्वरूपांची पूजा केली जाते.( navratri 2026) या प्रत्येक रूपातून धैर्य, शक्ती, न्यान, सकारात्मकता, भक्ती असे वेगवेगळे संदेश मिळतात अशी धार्मिकमान्यता आहे. नवरात्र उत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून हा उत्सव वाईट प्रवृत्तीवर चांगलया प्रवृत्तीचा विजय अशी या उत्सवाची मान्यता आहे. नवरात्री उत्सवात नऊ दिवस देवीची आराधना, भजन, कीर्तन, उपासना केली जाते. विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रासह देशच्या विविध भागात गरबा आणि दांडिया यांसारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे या उत्सवाला एक वेगळीच रंगत येते. हिंदू धार्मिक परंपरेनुसार नवरात्री हा आदिशक्ती दुर्गादेवीच्या उपासनेचा एक महत्वाचा दिवस म्हणून ओळखला जातो. प्रत्यक्ष दिवशी देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. प्रत्येक दिवसात देवीच्या प्रत्येक रूपांची वेगळी आरासना केली जाते. देवीला प्रत्येक दिवशी वेगळा नैवेद्य, फुले, पूजेचे साहित्य अर्पण करण्याची परंपरा अनेक ठिकाणी जपली जाते. भाविक भक्ती भावाने पूजा करतात, आराधना करतात आणि यालाच या काळात खूप विशेष महत्व दिले जाते.
नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी कोणत्या देवीची पूजा केली जाते आणि कोणते नैवेद्य, कोणती फुले,आणि पूजेचे साहित्य वापरले जाते याची सविस्तर माहिती जाणून घेऊया नवरात्री च्या ९ दिवसांची संपूर्ण माहिती: १. पहिला दिवस – देवी शैलपुत्री तारीख : ११ ऑक्प्रटोबर २०२६                                                                                                                                                                                                        प्रतीक : शक्ती, स्थैर्य आणि नवीन सुरुवात. देवीचे स्वरूप : शैलपुत्री म्हणजे पर्वतराज हिमालयाची कन्या. देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ असते. तिचे वाहन नंदी आहे. नैवेद्य : गायीचे तूप, खीर किंवा परंपरेनुसार गोड पदार्थ. फुले : पांढरी किंवा लाल फुले. पूजासाहित्य : कुंकू, अक्षता, फुले, धूप आणि दीप. धार्मिक महत्त्व : देवी शैलपुत्री ही शक्ती आणि निसर्गाचे प्रतीक मानली जाते. नवरात्रीच्या पहिलया दिवशी तिची पूजा करून भक्त नवीन कार्याची सुरुवात आणि जीवनातील स्थैर्यासाठी प्रार्थना करतात. २. दुसरा दिवस – देवी ब्रह्मचारिणी तारीख : १२ ऑक्टोबर २०२६ प्रतीक : तपश्चर्या, संयम आणि भक्ती. देवीचे स्वरूप : देवी ब्रह्मचारिणीच्या एका हातात जपमाळ आणि दुसऱ्या हातात कमंडलू असतो. तिचे स्वरूप शांत आणि तेजस्वी आहे. नैवेद्य : साखर, खडीसाखर आणि फळे. फुले : पांढरी फुले किंवा जाई-जुईची फुले. पूजासाहित्य : फुले, अक्षता, धूप, दीप आणि नैवेद्य. धार्मिक महत्त्व : देवी ब्रह्मचारिणी ही कठोर तपश्चर्या, संयम आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे. तिच्या पूजेतून भक्तांना ध्येय साध्य करण्यासाठी चिकाटी आणि आत्मसंयम ठेवण्याची प्रेरणा मिळते. ३. तिसरा दिवस – देवी चंद्रघंटा तारीख : १३ ऑक्टोबर २०२६ प्रतीक : शौर्य, धैर्य आणि निर्भयता. देवीचे स्वरूप : देवीच्या कपाळावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र असतो. ती सिंहावर स्वार असते आणि तिच्या अनेक हातांमध्ये विविध अस्त्रे असतात. नैवेद्य : खीर आणि दुधापासून बनवलेले गोड पदार्थ. फुले : लाल किंवा पिवळी फुले. पूजासाहित्य : कुंकू, अक्षता, फुले, धूप आणि दीप. धार्मिक महत्त्व : देवी चंद्रघंटा ही धैर्य आणि पराक्रमाचे प्रतीक मानली जाते. तिच्या पूजेतून अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची आणि संकटांचा धैर्याने सामना करण्याची प्रेरणा मिळते. ४. चौथा दिवस – देवी कूष्मांडा तारीख : १४ ऑक्टोबर २०२६ प्रतीक : सृष्टीची निर्मिती, ऊर्जा आणि समृद्धी. देवीचे स्वरूप : धार्मिक मान्यतेनुसार देवी कूष्मांडाने आपलया दिव्य हास्याने सृष्टीची निर्मिती केली. तिला अष्टभुजा देवी असेही म्हटले जाते. नैवेद्य : मालपुआ किंवा गोड पदार्थ. फुले : नारिंगी किंवा पिवळी फुले. पूजासाहित्य : फुले, कुंकू, अक्षता, धूप, दीप आणि फळे. धार्मिक महत्त्व : देवी कूष्मांडा ही विश्वातील ऊर्जा आणि सर्जनशीलतेचे प्रतीक आहे. तिची पूजा करून भक्त आरोग्य, सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. ५. पाचवा दिवस – देवी स्कंदमाता तारीख : १५ ऑक्टोबर २०२६ प्रतीक : मातृत्व, प्रेम आणि वात्सलय देवीचे स्वरूप : देवी स्कंदमातेच्या मांडीवर भगवान कार्तिकेय अर्थात स्कंद विराजमान असतात. ती सिंहावर स्वार असलेली आणि कमळ धारण केलेली देवी म्हणून ओळखली जाते. नैवेद्य : केळी आणि इतर फळे. फुले : पांढरी किंवा पिवळी फुले. पूजासाहित्य : कमळ, फुले, अक्षता, धूप आणि दीप. धार्मिक महत्त्व : देवी स्कंदमाता ही मातृत्व, माया आणि प्रेमाचे प्रतीक मानली जाते. तिच्या पूजेतून कुटुंबातील प्रेम, आपुलकी आणि मुलांच्या कल्याणाचे महत्त्व अधोरेखित होते. ६. सहावा दिवस – देवी कात्यायनी तारीख : १६ ऑक्टोबर २०२६ प्रतीक : पराक्रम, धैर्य आणि स्त्रीशक्ती. देवीचे स्वरूप : देवी कात्यायनीचे स्वरूप तेजस्वी आणि सामर्थ्यशाली आहे. ती सिंहावर स्वार असते आणि तिच्या हातांत विविध अस्त्रे असतात. नैवेद्य : मध आणि गोड पदार्थ. फुले : लाल किंवा पिवळी फुले. पूजासाहित्य : कुंकू, अक्षता, फुले, धूप आणि दीप. धार्मिक महत्त्व : देवी कात्यायनी ही शक्ती आणि अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचे प्रतीक मानली जाते. तिच्या पूजेतून महिलांच्या सामर्थ्याचा, आत्मविश्वासाचा आणि स्वाभिमानाचा संदेश दिला जातो. ७. सातवा दिवस – देवी कालरात्री तारीख : १७ ऑक्टोबर २०२६ प्रतीक : निर्भयता, संकटांवर मात आणि अंधकाराचा नाश. देवीचे स्वरूप : देवी कालरात्रीचे स्वरूप उग्र असले तरी ती आपल्या भक्तांचे रक्षण करणारी मानली जाते. तिचे वाहन गाढव आहे. नैवेद्य : गुळ आणि गुळापासून बनवलेले पदार्थ. फुले : लाल किंवा इतर गडद रंगांची फुले. पूजासाहित्य : फुले, कुंकू, अक्षता, धूप आणि दीप. धार्मिक महत्त्व : देवी कालरात्री ही भय आणि नकारात्मकतेवर विजय मिळवण्याचे प्रतीक आहे. तिच्या पूजेतून कठीण परिस्थितीत धैर्य राखण्याची आणि संकटांचा सामना करण्याची प्रेरणा मिळते. ८. आठवा दिवस – देवी महागौरी तारीख : १८ ऑक्टोबर २०२६ प्रतीक : पवित्रता, शांती आणि करुणा. देवीचे स्वरूप : देवी महागौरीचे स्वरूप अत्यंत शांत आणि प्रसन्न आहे. ती पांढरी वस्त्रे धारण करते. तिचे वाहन वृषभ म्हणजे बैल आहे. नैवेद्य : नारळ, खीर आणि गोड पदार्थ. फुले : पांढरी फुले, मोगरा किंवा जाई. पूजासाहित्य : कुंकू, अक्षता, फुले, धूप, दीप आणि नैवेद्य. धार्मिक महत्त्व : देवी महागौरी ही शुद्धता, शांती आणि करुणेचे प्रतीक मानली जाते. या दिवशी अनेक ठिकाणी अष्टमीपूजन, कन्यापूजन आणि विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ९. नववा दिवस – देवी सिद्धिदात्री तारीख : १९ ऑक्टोबर २०२६ प्रतीक : सिद्धी, ज्ञान आणि आध्यात्मिक पूर्णत्व. देवीचे स्वरूप : देवी सिद्धिदात्री कमळावर विराजमान असते. तिच्या चार हातांत शंख, चक्र, गदा आणि कमळ असल्याचे वर्णन आढळते. नैवेद्य : तीळ, गोड पदार्थ आणि फळे. फुले : कमळ किंवा विविध रंगांची ताजी फुले. पूजासाहित्य : कुंकू, अक्षता, फुले, धूप, दीप आणि नैवेद्य. धार्मिक महत्त्व : देवी सिद्धिदात्री ही ज्ञान, सिद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीचे प्रतीक मानली जाते. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी तिची पूजा करून भक्त जीवनात यश, समाधान आणि सकारात्मकतेसाठी प्रार्थना करतात.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >