मुंबई: मराठी सिनेसृष्टीकडून प्रेक्षकांना विविध आशयघन कलाकृती असलेले चित्रपट पाहायला मिळत आहेत. आपण बऱ्याचदा बालपणी ऐकलेली 'कापुसकोंडा'ची गोष्ट ...
अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या 'जलसा' निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने चाहत्यांची गर्दी जमली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी घराबाहेर येऊन चाहत्यांचे भरभररून आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी लाल रंगाचा कुर्ता घातला होता. चाहत्यांकडून प्रेम आणि आशिर्वाद घेत असताना काही लहान मुलांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या पुढे जाऊन अमिताभ बच्चन यांच्याजवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. याचदरम्यान एका महिलेने अमिताभ बच्चन यांच्याशी हात मिळवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी तिला हात मिळवण्यासाठी नकार दिला. त्यानंतर त्यांनी उपस्थित चाहत्यांना हात जोडून अभिवादन केले आणि त्यांच्या शुभेच्छांबद्दल आभार मानले. वाढदिवशी चाहतीला अमिताभ बच्चन यांनी हात मिळवण्यासाठी नकार दिल्यामुळे ते सध्या सोशल मीडियावर कमालीचे चर्चेत आले आहेत.( BIG-B)
मुंबई: बॉलिवूडची धकधक गर्ल अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या चाहत्यांना नव्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. कायमच अभिनय आणि डान्सच्या ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या वाढदिवसानिमित्त अमिताभ बच्चन त्यांच्या 'जलसा' बंगल्याबाहेर चाहत्यांच्या भेटीसाठी जमले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी घराबाहेर येऊन चाहत्यांचे भरभररून आशीर्वाद घेतले. चाहत्यांना अभिवादन करत असताना काही लहान मुलांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या पुढे जाऊन अमिताभ बच्चन यांच्याजवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. याचदरम्यान एका महिलेने अमिताभ बच्चन यांच्याशी हात मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी उपस्थित चाहत्यांना हात जोडून अभिवादन केले आणि त्यांच्या शुभेच्छांबद्दल आभार मानले.(CNTROVERSY)
सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये मते पाहायला मिळत आहेत. काही नेटकऱ्यांनी महिला चाहती मोठ्या अपेक्षेने आली होती, त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी तिच्याशी हस्तांदोलन करायला हवे होते, असे मत मांडले. दुसरीकडे, काहींनी कलाकारांच्या वैयक्तिक बाबींचा आदर करणे आवश्यक असल्याचे सांगितले. सुरक्षा व्यवस्था ओलांडून कलाकारांजवळ जाण्याचा प्रयत्न करणे योग्य नसल्याचेही काही नेटकऱ्यांनी सांगितले आहे. बिग बी यांच्या वाढदिवसा निमित्त बॉलिवूड इंडस्ट्रीतून चिरंजीवी, काजोल, संजय दत्त, प्रभास, कमल हसनसह अनेक कलाकारांनी अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा वाढदिवस खास केला. बिग बी ना हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतून भरभरून प्रेम मिळताना दिसून आले.
मुंबई: नितेश तिवारी दिग्दर्शित, ‘रामायण’ या बहुचर्चित चित्रपटातील आणखी दोन महत्त्वाच्या पात्रांचे पोस्टर समोर आले आहेत. अभिनेत्री लारा दत्ता राणी ...