एका कुत्र्यामुळे नात्यांची गोष्ट उलगडणार; सचिन पिळगांवकर आणि मधुराणी गोखलेच्या ‘कापूसकोंडा’चा एकदम हटके टीझर प्रदर्शित

मानवी नाते संबंध, कुटुंब, भावभावनांवर आधारित असलेला मनोरंजक 'कापूसकोंडा' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून नुकताच चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे.

मुंबई: मराठी सिनेसृष्टीकडून प्रेक्षकांना विविध आशयघन कलाकृती असलेले चित्रपट पाहायला मिळत आहेत. आपण बऱ्याचदा बालपणी ऐकलेली 'कापुसकोंडा'ची गोष्ट प्रेक्षकांना चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. मानवी नाते संबंध, कुटुंब, भावभावनांवर आधारित असलेला मनोरंजक 'कापूसकोंडा' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या 23 ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज होणार असून नुकताच चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे. तगडी स्टारकास्ट असलेल्या चित्रपटाच्या कथानकाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.



चित्रपटाच्या कथानकाबद्दल सांगायचे तर, राजा, राणी आणि राजकुमारी असलेल्या 'हॅपी गो लकी' फॅमिलीची चित्रपटामध्ये रंजक गोष्ट आहे. निवृत्त कर्मचारी आणि त्याला भेट म्हणून मिळालेला कुत्रा यांच्या नात्यावर आधारित ही गोष्ट आहे. 'कापूसकोंडा, अ फॅमिली डॉग फिल्म' अशी टॅगलाइन देत सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या कथेमध्ये एका कुत्र्यामुळे कथानकात काय काय घडामोडी घडतं? त्यातून मानवी भावभावना, नातेसंबंध कशा पद्धतीनं उलगडत जातात हे पहाणं मजेशीर ठरणार आहे. टीजरपाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता वाढली आहे. उत्तम कथानकाला तितक्याच सक्षम अभिनयाची जोड असल्यानं हा चित्रपट नक्कीच मनोरंजनाची पर्वणी ठरेल, यामध्ये शंका नाही. येत्या 23 ऑक्टोबरला चित्रपट रिलीज होणार आहे.


&t=67s

'कापूसकोंडा' चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत, अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री मधुराणी गोखले यांच्यासह नवीन पिढीतील अभिनेत्री अक्षता पाडगांवकर, जान्हवी तांबट आणि अभिनेता भूषण पाटील अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. दरम्यान, या चित्रपटानिमित्त प्रेक्षकांना पुन्हा एकदा सचिन आणि मधुराणी एकाच फ्रेममध्ये एकत्र पाहायला मिळणार आहे. 'कापूसकोंडा' चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन मोहिते यांनी केले आहे. तर, सचिन मोहिते, गणेश पंडित, ऋषिकेश तुरई यांनी चित्रपटाची पटकथा आणि संवादलेखन केले आहे. चित्रपटाची निर्मिती, जास्वंद एंटरटेन्मेंट्स प्रा.लि. कंपनीकडून करण्यात आली असून नोरामा स्टुडिओस प्रस्तुत व्हीपी माऊली ग्रुप ऑफ कंपनीज सह स्टोरीवाला फिल्मच्या बॅनरखाली चित्रपट रिलीज केला जाणार आहे. चित्रपटातील गाण्यांना संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी स्वरबद्ध केले आहेत, तर अभिजीत हेगडे- पाटील पार्श्वसंगीत दिले आहे. चित्रपटातील गाण्यांना गायक अवधूत गुप्ते आणि पद्मनाभ गायकवाड यांनी आवाज दिला आहे.


Comments
Add Comment

भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री न्यायाच्या रणधुमाळीत आमने-सामने ! मराठी Zee 5 वर 'कोण यशवंत पानसरे'चा होणार प्रीमियर !

एखाद्या चक्रात अडकल्यावर मुक्तीचा शोध घेणाऱ्या व्यक्तीला त्याच व्यवस्थेचा सामना करण्यास भाग पाडले जाते;

ब्लॉकबस्टर Drishyam 3, स्वत:चाच रेकॉर्ड मोडत अजय देवगणचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

मुंबई: अजय देवगणच्या 'दृश्यम 3'ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसत आहे. 2 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झालेला

Sai Paranjpye : ज्येष्ठ नाटककार सई परांजपे यांना यंदाचा मानाचा 'विष्णुदास भावे गौरव पदक' पुरस्कार जाहीर

सांगली : नाट्यशास्त्र आणि रंगभूमीच्या क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नाटककार, लेखिका व

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आठवणीने अमिताभ बच्चन भावुक; KBC च्या मंचावर व्यक्त केल्या भावना

Bollywood News: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यातील आदराचे नाते पुन्हा चर्चेत आले

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गुरूवारी पहाटे गोव्यामध्ये निधन झाले. गोव्यातील डोना पाऊलमधील राहत्या

Nana Patekar: निधनानंतरही चाहत्यांना नाना पाटेकर रुपेरी पडद्यावर पाहता येणार, कसं काय? ते जाणून घ्या

मुंबई: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या 75 व्या वर्षी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले