IND vs WI: तिसऱ्या टी20 सामना संपल्यानंतर उर्वरित दोन सामन्याचं श्रेयस अय्यरने गणित मांडलं, म्हणाला..
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. तीन सामन्यानंतर भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता उर्वरित दोन सामन्यात वेस्ट इंडिजची करो या मरोची स्थिती आहे. तर भारताला दोन पैकी एक सामना काहीही करून जिंकायचा आहे.
October 12, 2026 03:40 PM
IND vs WI: तिसऱ्या टी20 सामना संपल्यानंतर उर्वरित दोन सामन्याचं श्रेयस अय्यरने गणित मांडलं, म्हणाला.. (Photo: ANI)
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दोन सामने शिल्लक आहे. भारताने या मालिकेत दोन, तर वेस्ट इंडिजने एक सामना जिंकला आहे. त्यामुळे ही मालिका रंगतदार वळणावर आली आहे. भारताने चौथा टी20 सामना जिंकला तर मालिका खिशात घालेल. पण हा विजय वाटतो तितका सोपा नाही. कारण वेस्ट इंडिजने दुसऱ्या टी20 सामन्यात 250 धावांचं लक्ष्य 9 चेंडू राखून पूर्ण केलं होतं. तर तिसऱ्या टी20 सामन्यात 223 धावांचा पाठलाग करताना 209 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे हा सामना 14 धावांनी गमवावा लागला होता. खरं तर वेस्ट इंडिजचे खेळाडू फॉर्मात आहे. शाई होपने आपला फॉर्म काय आहे हे पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात दाखवून दिलं आहे. पण तिसऱ्या सामन्यात झटपट बाद झाल्याने भारताचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यात काहीही होऊ शकतं. त्यामुळे सर्वांच्या नजरा या चौथ्या सामन्याकडे खिळल्या आहे. चौथ्या सामन्यात वेस्ट इंडिजसाठी करो या मरोची स्थिती आहे. असं असताना भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने मोठं विधान केलं आहे.
काय म्हणाला श्रेयस अय्यर?
तिसऱ्या टी20 सामन्यात विजय मिळवल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने पुढच्या दोन सामन्यांचं गणित सांगून टाकलं. कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, 'दोन्ही मैदाने जास्त धावा होणारी आहेत. पण आपण आतापर्यंत ज्या प्रक्रियेचे आणि नियमांचे पालन करत आलो आहोत, त्याला चिकटून राहणे महत्त्वाचे आहे. तसेच, आपला दृष्टिकोन पुरेसा आक्रमक असेल आणि आपली वृत्तीही सर्वोत्तम असेल याची खात्री करणे आवश्यक आहे.' श्रेयस अय्यरचं विधान पाहता दोन्ही टी20 सामने हे सर्वाधिक धावांचे होतील असंच दिसत आहे. त्यामुळे या दोन्ही सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा टी20 सामना इंदुरच्या होळकर मैदानात पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्याने भारताच्या वाटेला प्रथम ...
भारताने पहिल्या टी20 सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. हा सामना भारताने सहज जिंकला. पण दुसऱ्या टी20 सामन्यात नाणेफेकीचा कौल गमवल्याने भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. भारताने या सामन्यात 249 धावा केल्या होत्या. पण या धावांचा पाठलाग वेस्ट इंडिजने यशस्वीरिता केला. तिसऱ्या टी20 सामन्यात पुन्हा एकदा नाणफेकीचा कौल गमावला आणि फलंदाजी करावी लागली. भारताने या सामन्यात 223 धावांचं लक्ष्य ठेवलं. तर वेस्ट इंडिजने 209 धावांपर्यंत मजल मारली.