का निवडली 17 वाजून 45 मिनिटांची वेळ?
मुंबई इंडियन्सने पोस्ट करण्यासाठी जी वेळ निवडली ती खूपच महत्त्वाची आहे. कारण याचा संदर्भ थेट रोहित शर्माच्या जर्सीशी जुळवला जात आहे. रोहित शर्माच्या जर्सीचा नंबर 45 आहे. त्याच्या कर्णधारपदाची घोषणा 17:45 वाजता केली आणि चाहत्यांना एक खास संदेश दिला. 17:45 मधील 17 हा अंक रोहित शर्मा 17 वर्षांपासून फ्रेंचायझीसोबत असल्याचं दाखवत आहे. तो आयपीएल 2027 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी 17वं पर्व खेळणार आहे. रोहित शर्माने 2013 पहिल्यांदा मुंबई इंडियन्सची सूत्र हाती घेतली होती. त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल जेतेपद मिळवलं होतं. फ्रेचायझीसाठी सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून त्याची गणना होते.
Rohit Sharma : 'चला, सगळ्यांनी छान हसा..', मुंबई इंडियन्सचा कर्णधार होतात रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया Video
IPL 2027 Mumbai Indians Captain Name : रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी विराजमान झाला आहे. मागच्या तीन पर्वात मुंबई इंडियन्समध्ये एक खेळाडू म्हणून ...
आयपीएल 2020 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने शेवटचं जेतेपद जिंकलं होतं. त्यानंतर मुंबई इंडियन्सची स्थिती खालावली. 2021 मध्ये मुंबई इंडियन्स संघ पाचव्या स्थानी, 2022 मध्ये दहाव्या स्थानी आणि 2023 मध्ये क्वॉलिफायर 2 मध्ये स्थान मिळवून बाहेर गेला. त्यानंतर हार्दिक पांड्याकडे सूत्र सोपवण्यात आली. आयपीएल 2024 मध्ये मुंबईचा संघ दहाव्या, 2025 मध्ये क्वॉलिफायर 2 आणि 2026 मध्ये नवव्या स्थानावर राहिला. मुंबई इंडियन्स आता रोहित शर्माच्या कर्णधारपदाखाली 20व्या हंगामात खेळणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा विजेतेपद मिळवण्याची फ्रँचायझीला आशा आहे.