
मुंबई : मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला (एसआयआर) विरोध करण्यासाठी ठाकरे बंधूंनी केलेल्या आंदोलनावर मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी सोमवारी जोरदार टीका केली. एसआयआरमुळे निवडणुकीत विजय मिळाल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांनी आधी स्वतःच्या आमदारकीचे राजीनामे द्यावेत, असे आव्हान त्यांनी दिले. आदित्य ठाकरे यांनी वरळीतील आमदारकीचा राजीनामा द्यावा, तर मनसेने दादर-माहीमचे उबाठा आमदार महेश सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी करावी, असेही ते म्हणाले. ठाकरे बंधूंचे आंदोलन हे लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी नसून बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांना मतदारयादीत ठेवण्याच्या समर्थनासाठी असल्याचा आरोपही राणे यांनी केला. (MPSC andolan)
पुणे : पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर मोठा निर्णय घेतला आहे. ...
पत्रकार परिषदेत बोलताना राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेचा संदर्भ देत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. बाळासाहेबांनी आयुष्यभर हिंदुत्वाची भूमिका सोडली नाही. बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांविरोधात त्यांनी कठोर भूमिका घेतली होती. काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्नही त्यांनी मुंबईतून उपस्थित केला होता. मात्र, आताच्या ठाकरे पिढीने बाळासाहेबांच्या विचारांपासून फारकत घेतली आहे, अशी टीका राणे यांनी केली. बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होत असताना ठाकरे बंधूंनी त्यांची बाजू घेतली नाही किंवा त्यांच्या समर्थनार्थ आंदोलने केली नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
पुणे : एमपीएससीच्या पेपरफुटी प्रकरणावरून पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या ...
बाळासाहेबांनी हिंदूंची सुरक्षा, मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राच्या हितासाठी भूमिका घेतली होती; मात्र, सध्याचे ठाकरे बंधू बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या समर्थनासाठी वाहनांवर चढून घोषणाबाजी करत आहेत. बाळासाहेबांच्या नावाचा आणि छायाचित्रांचा वापर करून स्वतःची तुलना त्यांच्याशी करू नये, असेही राणे म्हणाले. कॅप्टन सुमित मच्चार यांनी अनेकांचे प्राण वाचविले. मात्र, ठाकरेंनी त्यांच्याबद्दल साधी समाजमाध्यमांवर पोस्टही केली नाही. हिंदूंच्या बाजूने भूमिका घेणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याऐवजी ठाकरे बंधू मतदारयाद्यांच्या मुद्द्यावर आंदोलन करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. तसेच, भाईंदर परिसरात एका मुस्लिम महिलेच्या तक्रारीवरून मनसे कार्यकर्त्यांनी एका हिंदू व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप करत, उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिल्याने राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेत बदल होत असल्याची टीका केली.
अमित ठाकरे यांनी आणीबाणीच्या काळात इंटरनेट बंद झाल्याचा उल्लेख केल्याचा संदर्भ देत राणे यांनी त्यांच्यावरही निशाणा साधला. आदित्य ठाकरे यांच्यासोबत अधिक वेळ घालवल्याने त्यांच्यावर परिणाम होत असल्याचा टोला त्यांनी लगावला. आदित्य ठाकरे यांनी आंदोलनादरम्यान पोलीस वाहनावर उभे राहून केलेल्या घोषणाबाजीवरूनही राणे यांनी टीका केली. दिशा सालियान प्रकरणाच्या संदर्भात अमली पदार्थविरोधी यंत्रणेकडे आदित्य ठाकरे यांच्या अमली पदार्थ सेवनाबाबत काही संभाषणांचे पुरावे असल्याचा आरोप त्यांनी केला.
ठाकरेंनी आधी कलानगर बंद करून दाखवावे
ठाकरे बंधूंनी मुंबई बंद करण्याची भाषा करण्याऐवजी आधी कलानगरमधील मातोश्री परिसर बंद करून दाखवावा, असे आव्हान मंत्री राणे यांनी दिले. मुंबई बंद करण्याची ताकद फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्यात होती, असेही ते म्हणाले. नवरात्रोत्सवाच्या काळात आंदोलन करून हिंदू सणांच्या वातावरणात अस्वस्थता निर्माण केली जात आहे. गणेशोत्सवाच्या काळात दंगली होण्याबाबत वक्तव्ये करण्यात आली आणि नवरात्राच्या घटस्थापनेच्या दिवशी आंदोलन करण्यात आले. ईद आणि मोहरमच्या वेळी अशी आंदोलने का केली जात नाहीत, असा सवाल करत त्यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली.
Vikram Pachpute : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
एमपीएससी आंदोलनाचे श्रेय रोहित पवारांना नाही
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील कथित अनियमितता आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून पुण्यात सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित झाल्यानंतर राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले केले. विद्यार्थ्यांच्या १३ मागण्यांपैकी १२ मागण्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच भेटीत मान्य केल्या होत्या. उर्वरित मागणीवरही सरकार सकारात्मक होते. चौकशी प्रक्रियेत अडथळा येऊ नये म्हणून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर गेले आहेत. त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक करायला हवे, असे राणे म्हणाले. (rohit pawar updates)
आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवावा, अशी भूमिका आपण मांडत होतो, असे राणे यांनी सांगितले. त्यामुळे एमपीएससी आंदोलन मागे घेण्याला रोहित पवारांचा विजय म्हणण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रयत्नांचे श्रेय मान्य करायला हवे, असे राणे यांनी सांगितले.
रोहित पवारांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याचा सल्ला राज ठाकरे यांनीही दिला होता. हा सल्ला वेळेत स्वीकारला असता तर विद्यार्थ्यांचा वेळ वाचला असता आणि बारामती अॅग्रो तसेच विश्वजीत कदम यांच्या महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागला नसता, असे ते म्हणाले. एमपीएससी अध्यक्षांचे पद हे बारामती अॅग्रोच्या महाव्यवस्थापकाच्या पदासारखे नसून, अशा घटनात्मक पदांवरील नियुक्ती आणि राजीनाम्याची स्वतंत्र प्रक्रिया असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रोहित पवारांनी मंत्रिपदासाठी जॅकेट शिवली
रोहित पवार लवकरच मंत्रिमंडळात दिसतील. त्यासाठी त्यांनी दोन जॅकेटही शिवून ठेवली आहेत. मंत्रिमंडळात समावेशाची तारीख आणि महिना त्यांना माहीत असून, याबाबत रोहित पवार यांनाच अधिक विचारावे, असे मंत्री नितेश राणे म्हणाले.(rohit pawar)




