Friday, November 27, 2026

लग्नाआधी त्वचेवर आणा नैसर्गिक चमक! 2 चमचे बेसनपासून तयार करा घरगुती ब्राइडल स्क्रब

लग्नसराईच्या दिवसांत होणारी नवरी तात्काळ चमक आणि सतेज त्वचा मिळवण्यासाठी काही महिने आधीपासूनच महागडे फेशियल, ब्लीच आणि रासायनिक उपचारांचा अवलंब करू लागते. कधीकधी ही महागडी उत्पादने त्वचेला नुकसान पोहोचवतात किंवा नैसर्गिक चमक देण्यात अयशस्वी ठरतात. जर तुमचे लग्न लवकरच होणार असेल आणि तुम्हाला नैसर्गिकरित्या चमकदार त्वचा हवी असेल तर पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. तुमच्या स्वयंपाकघरातील बेसन तुमच्या त्वचेसाठी वरदान आहे. फक्त २ चमचे बेसन तुमच्या त्वचेला तेजस्व बनवू शकते. हा जादुई स्क्रब बनवण्याची आणि वापरण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया.

आवश्यक साहित्य :

बेसन - २ चमचे कच्चे दूध - २-३ चमचे (तेलकट त्वचा असलेले लोक दही किंवा गुलाबजल वापरू शकतात) कस्तुरी हळद - १/४ टीस्पून मध - १/२ चमचा गुलाबपाणी - काही थेंब

कृती:

एका लहान वाटीत २ चमचे बेसन घ्या. त्यात १/४ चमचे कस्तुरी हळद, १/२ चमचा मध आणि पेस्ट करण्यासाठी पुरेशा प्रमाणात कच्चे दूध घाला. स्क्रब लावण्यापूर्वी आपला चेहरा ताज्या पाण्याने किंवा गुलाब पाण्याने धुवून पुसून घ्या. आता ही तयार केलेली बेसनची पेस्ट तुमचया चेहऱ्यावर, मानेवर आन हातांवर व्यवस्थित लावा. १५ मिनिटे सुकू द्या. जेव्हा ते ८०% सुकेल, तेव्हा हातावर थोडे पाणी किंवा गुलाबजल घेऊन गोलाकार हालचालींमध्ये हलक्या हाताने चोळा. यानंतर चेहरा, ताज्या किंवा कोमट पाण्याने धुवा आणि चांगले मॉइश्चरायझर किंवा कोरफड जेल लावा. हा पारंपरिक बेसन दुधाचा स्क्रब आठवड्यातून २ ते ३ वेळा वापरल्याने लग्नाच्या दिवसापर्यंत तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार होईल आणि चेहरा निर्दोष दिसेल.

टीप : साध्या हळदीऐवजी कस्तुरी हळद वापरा कारण ती त्वचेवर पिवळेपणा येऊ देत नाही आणि त्वचा डागविरहित राहते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >