आधुनिक विचार, नात्यांची गंमत अन् भावनांचा सुंदर मेळ असलेल्या ‘लग्न आणि बरंच काही’चा ट्रेलर आणि गाणी प्रदर्शित!

वेदांती चंद्रकांत दाणी दिग्दर्शित, नाद स्टुडिओस प्रस्तुत आणि अव्यान आर्ट्स आणि म्हाळसा एंटरटेनमेंट निर्मित ‘लग्न आणि बरंच काही’ या धमाल सिनेमाचा ट्रेलर ९ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे. सोबतच चित्रपटातील दोन धमाल गाणी “मला लग्नाची झालिया घाई” आणि “साखरपुडा” सुद्धा रिलीज झाली आहेत. लग्न म्हणजे प्रेमाचा हॅप्पी एंडिंग की एका नव्या पिक्चरची सुरुवात? या प्रश्नाचं मनोरंजक उत्तर या सिनेमातून मिळणार आहे. मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार पूजा सावंत आणि अभिजीत खांडकेकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये मनोरंजनाची धमाल, भावनिक क्षण आणि मनाचा ठाव घेणाऱ्या सुरेल गाण्यांची झलक पाहायला मिळत आहे.


‘लग्न आणि बरंच काही’ हा केवळ लग्नाभोवती फिरणारा चित्रपट नसून, आजच्या पिढीचे विचार, नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि विशेषतः महिलांच्या भावविश्वाला स्पर्श करणारी कथा मांडण्याचा प्रयत्न करतो. बदलत्या काळात प्रेम, लग्न, स्वतःची ओळख, नात्यांमधील अपेक्षा आणि समतोल यांविषयी अनेक प्रश्न निर्माण होतात. याच प्रश्नांना मनोरंजक पद्धतीने भिडणारा हा चित्रपट प्रेक्षकांना हसवतानाच काही क्षण अंतर्मुखही करणार आहे. विशेष म्हणजे लग्न आणि बरंच काही’च्या ट्रेलर आणि गीत अनावरण सोहळ्याला लोकप्रिय गायिका वैशाली सामंत यांची विशेष उपस्थिती होती. या चित्रपटातील गाण्यांना त्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने सजवले असून, संगीत दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे.याशिवाय, चित्रपटातील इतर गाण्यांनाही अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, सुरेश वाडकर, मैथिली जोशी आणि अवनी तुषार नान्नजकर अशा नामवंत गायकांचा सुरेल साज लाभला आहे.



पूजा सावंत आणि अभिजीत खांडकेकर यांच्या सोबत मराठी इंडस्ट्रीतील आणखी दमदार कलाकार जसे अक्षया नाईक, सुकन्या गुरव, भारती पाटील आणि इतर कलाकार देखील या चित्रपटात झळकणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरसोबतच त्यातील गाण्यांनीही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रेमाच्या भावना, लग्नाची धामधूम आणि नात्यांमधील विविध रंग संगीताच्या माध्यमातून अनुभवायला मिळत असल्याने या गाण्यांनी चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढवली आहे. ‘लग्न आणि बरंच काही’ या चित्रपटाचे दिग्दर्शन वेदांती चंद्रकांत दाणी यांनी केले असून, नाद स्टुडिओस प्रस्तुत आणि अव्यान आर्ट्स आणि म्हाळसा एंटरटेनमेंट निर्मित पिकल एंटरटेनमेंट यांच्या सहयोगाने हा सिनेमा साकारला आहे. अंजली तुषार नान्नजकर आणि डॉ. संजना सुरेश पै या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. यशश्री मसूरकर यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं नातं, की त्यापलीकडेही बरंच काही? या प्रश्नातून उलगडणारा प्रेम, भावना, नाती आणि सुरेल संगीताचा प्रवास मोठ्या पडद्यावर २३ ऑक्टोबर २०२६ रोजी अनुभवायला मिळणार आहे.

Comments
Add Comment

Marathi actor madhutai kambikar: ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन, मराठी कलाविश्वात पुन्हा एकदा शोककळा

मुंबई : ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधू कांबीकर यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन. १२ ऑक्टोबर २०२६ ला

‘काला हिरण’ प्रकरणी महत्त्वाची अपडेट, उच्च न्यायालयाने सलमान खानकडून मागवले उत्तर

मुंबई: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान काळवीट प्रकरणामुळे कमालीचा चर्चेत राहिला आहे. अभिनेत्याच्या ह्या प्रकरणावर

Drishyam Home Tour: 100 वर्षे जुना अन् पोर्तुगाली स्टाईलचं घर, 'दृश्यम' मधील विजय साळगावकरचा बंगला कुठेय?

मुंबई: चांद्यापासून बांद्यापर्यंत अजय देवगणच्या 'दृश्यम 3'ची चर्चा सुरू आहे. चित्रपटातील अनेक सीन्सने आणि कथेने

Madhuri Dixit: लोकांच्या टोमण्यांमुळे माधुरी दीक्षितही कधीकाळी खचलेली, आईने शिकवलेल्या संघर्षाच्या धड्यामुळे बदललं आयुष्य!

मुंबई: बॉलिवूडची धकधक गर्ल अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या चाहत्यांना नव्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार

कैकेयी- मंथरेची पहिली झलक; Ramayana चित्रपटातील लारा दत्ता आणि शीबा चढ्ढा यांच्या भूमिकेची चर्चा

मुंबई: नितेश तिवारी दिग्दर्शित, ‘रामायण’ या बहुचर्चित चित्रपटातील आणखी दोन महत्त्वाच्या पात्रांचे पोस्टर समोर

एका कुत्र्यामुळे नात्यांची गोष्ट उलगडणार; सचिन पिळगांवकर आणि मधुराणी गोखलेच्या ‘कापूसकोंडा’चा एकदम हटके टीझर प्रदर्शित

मुंबई: मराठी सिनेसृष्टीकडून प्रेक्षकांना विविध आशयघन कलाकृती असलेले चित्रपट पाहायला मिळत आहेत. आपण बऱ्याचदा