Tuesday, October 13, 2026

पुण्यात आणखी एक हुंडाबळी, सासरच्या जाचाला कंटाळून आयटी कर्मचारी महिलेची आत्महत्या

पुण्यातील ३३ वर्षीय आयटी इंजिनिअर महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळ होत असल्याने आत्महत्या केल्याचा आरोप महिलेच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणी महिलेचा पती आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यातील ३३ वर्षीय आयटी इंजिनिअर महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळ होत असल्याने आत्महत्या केल्याचा आरोप महिलेच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणी महिलेचा पती आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मृत महिलेचे वडील बाळकृष्ण निकम यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी तृष्णा हिने २०१८ मध्ये राहुल सकपाळ सोबत लग्न केले. लग्नापासूनच तृष्णावर तिचा पगार सासरच्यांना देण्यासाठी, माहेरचा फ्लॅट सासूच्या नावावर करण्यासाठी आणि सासर्यांसाठी १ कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी करण्यासाठी दबाव आणला जात होता. शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून ती २०२१ मध्ये माहेरी परतली होती. नंतर काही दिवसांनी तिच्या पतीने पुनर्विवाह करण्यासाठी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला, पण हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे.

२९ सप्टेंबर रोजी तृष्णा तिच्या घरी आत्महत्या केली. पोलिसांच्या हाती लागलेल्या पत्रात तिने आत्महत्येसाठी तिचा पती राहुल, सासू वैशाली, सासरे संजय, नणंद शैली आणि सासू शकुंतला साळुंखे यांना जबाबदार धरले आहे. वडिलांच्या तक्रारीच्या आधारे पाच आरोपींविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांपासून पुण्यात हुंडाबळीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या महिन्यातच एक प्रकरण समोर आले होते. ओंकार घिसारे नावाच्या मुलासोबत लग्न झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यांनी वैष्णवी जारंदे या २३ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. सासरच्या मंडळींकडून गाडीसाठी अतिरिक्त ५ लाख रुपयांची मागणी केल्याचा आणि तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप वैष्णवीच्या कुटुंबीयांनी केला होता.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >