Vijay-Rashmika at Tirupati : तिरुपती मंदिरात रश्मिका-विजयला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी; 'रणबाली'च्या रिलीजपूर्वी दोघांनी घेतले व्यंकटेश्र्वरांचे दर्शन

आगामी 'रणबाली' (Ranbali) या चित्रपटाच्या रिलीजपूर्वी या जोडीने देवाचे आशीर्वाद घेतले. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला रश्मिका अनुपस्थित राहिली होती, मात्र चेन्नईमध्ये तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांची भेट घेतल्यानंतर हे दोघे थेट तिरुपतीला पोहोचले.

तिरुपती : साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) आणि विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) यांनी मंगळवारी पहाटे आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध तिरुपती मंदिराला भेट दिली. आगामी 'रणबाली' (Ranbali) या चित्रपटाच्या रिलीजपूर्वी या जोडीने देवाचे आशीर्वाद घेतले. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला रश्मिका अनुपस्थित राहिली होती, मात्र चेन्नईमध्ये तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांची भेट घेतल्यानंतर हे दोघे थेट तिरुपतीला पोहोचले. मंगळवारी सकाळी मंदिराजवळ पापाराझींच्या कॅमेऱ्यात हे दोघे कैद झाले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता.



पारंपरिक पोशाखात आलेले पाहुणे अन् चाहत्यांची मोठी गर्दी



तिरुपती मंदिरात दर्शनासाठी पोहोचलेल्या विजय देवरकोंडा यांनी पारंपरिक पांढऱ्या रंगाचा सिल्क कुर्ता आणि लुंगी (धोती) परिधान केली होती, तर रश्मिका मंदानाने सुंदर पिवळ्या रंगाची सिल्क साडी आणि त्यावर गुलाबी रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज असा पारंपरिक लूक केला होता. मंदिर प्रशासनाच्या सहकार्याने आणि सुरक्षा पथकासोबत हे दोघे गर्दीतून मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचले. यावेळी आतमध्ये काही चाहत्यांनी त्यांना ओळखले, मात्र त्यांचे दर्शन सुरळीत पार पडले.



मंदिराबहेर चाहत्यांचा लढा आणि विजयने केलेले रश्मिकाचे संरक्षण


मात्र, दर्शन घेऊन बाहेर पडताना मंदिराबाहेर चाहत्यांची प्रचंड गर्दी जमली. प्रत्येकाला या स्टार जोडीसोबत फोटो काढायचा होता आणि सेल्फी घ्यायची होती. चाहत्यांच्या या अलोट गर्दीने त्यांना अक्षरशः घेरले (Mobbed). त्यांच्या टीमने त्यांना सुरक्षितपणे गोल्फ कार्टपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला, तरीही आजूबाजूला तुफान गर्दी जमा झाली होती. अशा गर्दीत विजय देवरकुंडाने अत्यंत काळजीपूर्वक आणि प्रोटेक्टिव्ह होत रश्मिकाला सुरक्षितपणे साभाळले. या सगळ्या धोधडपणीतही रश्मिकाने काही चाहत्यांना निराश न करता त्यांना हात मिळवला. चाहते त्यांच्या गोल्फ कार्टच्या मागेही धावताना दिसत होते, मात्र सुरक्षा रक्षकांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली.



'रणबाली'च्या प्रमोशनसाठी धडाका आणि मुख्यमंत्र्यांची भेट


रश्मिका मंदाना 'रणबाली' चित्रपटाच्या हैदराबादमधील ट्रेलर लॉन्चला उपस्थित राहू शकली नव्हती, कारण ती मुंबईत एका दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. मुंबईहून परतल्यानंतर तिने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विजय देवरकुंडासोबत पुन्हा हातमिळवणी केली. रविवारी सायंकाळी त्यांनी चेन्नईत जाऊन तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांची भेट घेतली आणि चित्रपटाचे प्रमोशन केले. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सोशल मीडियावर पोस्ट करत विजय आणि रश्मिकाने आपला आनंद व्यक्त केला होता आणि थलपती विजय यांच्या साधेपणाचे कौतुक केले होते.



काय आहे 'रणबाली' चित्रपट ?


राहुल सांकृत्यान दिग्दर्शित 'रणबाली' हा चित्रपट १९ व्या शतकातील ब्रिटिश राजवटीच्या काळातील दुष्काळ आणि संघर्षावर आधारित आहे. या चित्रपटात हॉलिवूड अभिनेता अर्नोल्ड वोस्लो (Arnold Vosloo) खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट येत्या १६ ऑक्टोबर रोजी मोठ्या पडद्यावर रिलीज होत आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर रजनीकांत आणि नेल्सन दिलीपकुमार यांच्या बहुप्रतिक्षित 'जेलर २' (जो १५ ऑक्टोबरला रिलीज होतोय) या चित्रपटाशी जोरदार टक्कर होणार आहे.

Comments
Add Comment

जिद्द, चिकाटी आणि रूढीवादी समजुती मोडून काढणारी एक प्रभावी कथा! सुमो दीदीचा ट्रेलर प्रदर्शित !

भारताची पहिली व्यावसायिक महिला सुमो कुस्तीपटू हेतल दवे यांच्या उल्लेखनीय प्रवासावर आधारित 'सुमो दीदी' या

Vijay setupati: विजय सेतुपती यांचा "ट्रेन" चित्रपट कधी होणार रिलीज?

अभिनेता विजय सेतुपती पुन्हा एकदा थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. नुकताच प्रदर्शित झालेला

Prithvi Shaw relationship : ‘माझी दिशाभूल झाली होती!’ साखरपुडा मोडल्यानंतर पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल पुन्हा एकत्र; नेमकं काय घडलं?

Prithvi Shaw relationship : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आकृती अग्रवाल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Ramayan: भारतीय संस्कृतीचा जगभरात डंका, "रामायण " दिसणार आता 40 भाषांमध्ये

मुंबई : रामायण चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. रामायण चित्रपट हा 40

बॉक्स ऑफिस गाजवायला एकता कपूरचा The Dirty Picture चा सीक्वेल येतोय, मुख्य भूमिकेत विद्या बालन की आणखी कोण?

मुंबई: विद्या बालनच्या गाजलेल्या ‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली

Sunny Deol अंत से आरंभ तक...' सनी देओलच्या ॲक्शन चित्रपटाची घोषणा, 'सुर्या'मधील लूकने वेधलं लक्ष

मुंबई : सनी देओल यांनी आजपर्यंत घायल, दामिनी, बॉर्डर, गदर: एक प्रेम कथा, गदर 2, बॉर्डर 2 यांसारखे सुपरहिट चित्रपट केले.