Dam Inspection : धरणांच्या बांधकामांचे होणार सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुल्यांकन

समितीच्या माध्यमातून बनवला जाणार अहवाल

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई महापालिकेच्या तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, पिसे, तुळशी व विहार या धरणांसाठी सर्वकष धरण सुरक्षा मूल्यांकन समिती अहवाल तयार करण्यासाठी आता तज्ज्ञांची नेमणूक करण्यात येणार आहे. ही मुल्यांकन समिती प्रत्येक धरणाच्या ठिकाणी स्थळ भेटी देवून मुल्यांकन अहवाल तयार करणार आहे.


मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील व मालकीच्या तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, पिसे, तुळशी व विहार या धरणांतुन मुंबई शहराला दैनंदिन पाणी पुरवठा केला जातो. केंद्र शासनाने धरण सुरक्षा कायदा, २०२१ भारताच्या अधिकृत राजपत्रात प्रकाशित केला असून ३० डिसेंबर २०२१ पासून अंमलात आणला आहे. धरण सुरक्षा अधिनियम २०२१ च्या कलम ३८ नुसार धरणाच्या मालकाने त्या धरणाची आणि त्यांच्या जलाशयाची स्थिती निश्चित करण्याच्या उद्देशाने, नियमानुसार गठीत केलेल्या तज्ञांच्या स्वतंत्र समितीमार्फत प्रत्येक धरणाचे सर्व समावेशक धरण सुरक्षा मुल्यांकन स्वतः करावे किंवा करुन घ्यावे.


परंतु, प्रत्येक विद्यमान धरणाचे पहिले सर्वसमावेशक धरण सुरक्षा मुल्यांकन या अधिनियमाच्या प्रारंभाच्या तारखेपासून पाच वर्षाच्या आत केले जावे आणि त्यानंतर अशा प्रत्येक धरणाचे सर्व समावेशक धरण सुरक्षा मुल्यांकन नियमांनुसार विनिर्दिष्ट केलेल्या नियमित अंतराने केले जावे असे नमुद केले आहे. या धरणांचे धरण सुरक्षा कायदा-२०२१ व राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरण यांच्या आवश्यकतेनुसार सर्वकष धरण सुरक्षा मुल्यांकन हे स्वंतत्र तज्ञ समितीकडून डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे.



राज्य धरण सुरक्षितता संघटना, नाशिक यांना धरण मुल्यांकन समितीबाबत पत्रव्यवहार केला आहे. तसेच, धरण सुरक्षा संघटना नाशिक व राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरण यांजकडून वारंवार पत्रव्यवहार व व्हिसी द्वारे संपर्क साधून तात्काळ अहवाल सादर करण्याचा सूचना दिल्या आहेत. अन्यथा धरण सुरक्षा कायदा अंतर्गत योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे कळविण्यात आले आहे. म्हणून मुल्यांकन समिती नेमणुक करण्यास प्रस्ताविले आहे.कोकण विभागातील तज्ञ समितीला मुंबई महानगरपालिकेच्या धरणाचे मुल्यांकन करण्याकरीता संमती विचारली असता त्यांनी संमती दर्शविली आहे.


महाराष्ट्र शासनाने नेमून दिलेल्या धरण सुरक्षा मुल्यांकन समितीतील प्रत्येक तज्ञ आपले तांत्रिक विषयानुसार काम करणार असल्याने उपरोक्त शासन निर्णयानुसार त्यांचे मानधन, प्रवास भत्ता व राहण्याचा तसेच जेवणाचा इत्यादी खर्च, समितीतील प्रत्येक सदस्यांना स्वतंत्र देणे आवश्यक आहे असे त्यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. त्या अनुषंगाने, तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, पिसे, तुळशी व विहार या धरणांची मुल्यांकन समितीची स्थळ भेटी आणि मुल्यांकन अहवाल तयार करण्यास ४५ लाख ९० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai Water Supply : पिण्याच्या पाण्याचा गैरवापर केल्यास होणार कारवाई, महापालिका प्रशासनाने दिला कारवाईचा इशारा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा कोणत्याही ठिकाणी

Santacruz Chembur Link Road : सांताक्रुझ चेंबूर लिंक रोडवरील उड्डाणपुलांच्या दुरुस्ती खर्चात १६ कोटींनी वाढ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पूर्व उपनगरातील सांताकुडा चेंबूर लिंक रोड आणि स्वामीनारायण उड्‌डाणपुलाच्या

BMC Mumbai : घनकचरा व्यवस्थापन, मलनिःसारण आणि मिठी नदी पुनरुज्जीवनासाठीच्या महानगरपालिकेच्या कामाबाबत पर्यावरण मंत्री समाधानी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून अभिनव

सणासुदीत भेसळखोरांवर FDA चा बडगा! अनेक आस्थापनांवर कारवाई

मुंबई : सणासुदीच्या कालावधीत नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या घटकांवर चाप बसवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA)

कसारा येथे 12 दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; 14 ते 16 ऑक्टोबरदरम्यान रेल्वे सेवांवर परिणाम

मुंबई : आसनगाव - कसारा तिसरी मार्गिका प्रकल्प आणि कसारा यार्डमधील 'अप' यार्ड लाईनच्या विस्ताराच्या कामासाठी मध्य

सर्वाधिक वर्दळीच्या रेल्वे स्थानकांच्या यादीत ठाणे नंबर 1, कल्याण, दादर, पनवेल आणि मुंबई CSMTचा कितवा क्रमांक?

मुंबई: कायमच गजबजलेल्या आणि सर्वाधिक व्यस्त म्हणून समजल्या जाणाऱ्या भारतीय रेल्वेकडून 'सर्वाधिक वर्दळीच्या