BMC Mumbai : घनकचरा व्यवस्थापन, मलनिःसारण आणि मिठी नदी पुनरुज्जीवनासाठीच्या महानगरपालिकेच्या कामाबाबत पर्यावरण मंत्री समाधानी

या सर्व उपाययोजना प्रभावी आणि समाधानकारक आहे, असे राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून अभिनव उपाययोजना केल्या जात आहे. राडारोड्याचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रथमच संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रभावी व्यवस्था केली जात आहे. तसेच, मिठी नदी पुनरुज्जीवनासाठी महानगरपालिका प्रशासन प्रभावीपणे कार्य करत आहे. तसेच, मलजल प्रक्रिया केंद्रांची निर्मितीची प्रक्रियाही गतीने सुरू आहे. या सर्व उपाययोजना प्रभावी आणि समाधानकारक आहे, असे राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.


पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेत मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा, मलनि:सारण आणि मिठी नदी पुनरुज्जीवनाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यायलयात सोमवारी १२ ऑक्टोबर २०२६ रोजी बैठक पार पडली. मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उप आयुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तसेच महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.



मुंबईत निर्माण होणाऱ्या बांधकाम आणि पाडकाम राडारोड्याचे व्यवस्थापन, वाहतूक, प्रक्रिया आणि विल्हेवाट यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘मुंबई डेब्रिज कंट्रोल अँड ट्रॅकिंग सिस्टीम’ ही सुविधा कार्यान्वित केली आहे. यावर आतापर्यंत २५५ आस्थापनांनी नोंदणी केली आहे. मुंबईतील २३१ कचऱ्याच्या संवेदनशील ठिकाणांचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कचऱ्यापासून ऊर्जा (वेस्ट टू एनर्जी) निर्मितीसाठी प्रकल्प उभारले जात आहेत. मुंबईत साधारणपणे २०२८ पर्यंत सात मलजल प्रक्रिया केंद्र कार्यान्वित होतील. तसेच, मिठी नदी पुनरुज्जीवनासाठी देखील योग्यप्रकारे उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती यावेळी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून सादर करण्यात आली.


त्यानंतर, पंकजा मुंडे म्हणाल्या, मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन अत्यंत आव्हानात्मक कार्य आहे. कचऱ्याच्या विलगीकरणाची प्रक्रिया अधिक प्रभावी होणे आवश्यक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून याबाबत प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. तथापि, नागरिकांनीदेखील स्वच्छता राखून आणि कचरा विलग करुनच सोपवायला हवा. राडारोडा व्यवस्थापनासाठी महानगरपालिकेने प्रभावी प्रणाली विकसित केली आहे. मलनि:सारणाच्या अनुषंगाने महानगरपालिकेने उभारलेले मलजल प्रक्रिया केंद्र (एसटीपी) नक्कीच प्रभावी आहेत. राज्य सरकारकडून राज्यातील नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी व्यवस्था निर्माण केली जात आहे. तथापि, मुंबईतील मिठी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी महानगरपालिकेकडून टप्पेनिहाय कामकाज सुरू आहे, ही समाधानकारक बाब आहे., असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Mumbai Water Supply : पिण्याच्या पाण्याचा गैरवापर केल्यास होणार कारवाई, महापालिका प्रशासनाने दिला कारवाईचा इशारा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा कोणत्याही ठिकाणी

Santacruz Chembur Link Road : सांताक्रुझ चेंबूर लिंक रोडवरील उड्डाणपुलांच्या दुरुस्ती खर्चात १६ कोटींनी वाढ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पूर्व उपनगरातील सांताकुडा चेंबूर लिंक रोड आणि स्वामीनारायण उड्‌डाणपुलाच्या

Dam Inspection : धरणांच्या बांधकामांचे होणार सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुल्यांकन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, पिसे, तुळशी व विहार या धरणांसाठी सर्वकष

सणासुदीत भेसळखोरांवर FDA चा बडगा! अनेक आस्थापनांवर कारवाई

मुंबई : सणासुदीच्या कालावधीत नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या घटकांवर चाप बसवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA)

कसारा येथे 12 दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; 14 ते 16 ऑक्टोबरदरम्यान रेल्वे सेवांवर परिणाम

मुंबई : आसनगाव - कसारा तिसरी मार्गिका प्रकल्प आणि कसारा यार्डमधील 'अप' यार्ड लाईनच्या विस्ताराच्या कामासाठी मध्य

सर्वाधिक वर्दळीच्या रेल्वे स्थानकांच्या यादीत ठाणे नंबर 1, कल्याण, दादर, पनवेल आणि मुंबई CSMTचा कितवा क्रमांक?

मुंबई: कायमच गजबजलेल्या आणि सर्वाधिक व्यस्त म्हणून समजल्या जाणाऱ्या भारतीय रेल्वेकडून 'सर्वाधिक वर्दळीच्या