Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर, 3.51 लाख शेतकऱ्यांचा समावेश

पुनर्गठित आणि फेरपुनर्गठित कर्जांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. योजनेच्या नियमांनुसार 1 एप्रिल 2026 पासूनचे पुढील व्याज आणि इतर खर्च माफ करण्याची तरतूद आहे.

मुंबई : राज्यातील कर्जाची परतफेड न करू शकलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी 12 ऑक्टोबर 2026 रोजी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्यातील 3 लाख 51 हजार 192 शेतकऱ्यांचा समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांनी आपली कर्जाची थकबाकी तपासून आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे. (Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana)



2 लाखांपर्यंतच्या थकीत पिकाकर्जाला माफी


या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या थकीत पीककर्जातून दिलासा मिळणार आहे. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या काळात घेतलेली, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली पात्र पीककर्जे या योजनेत समाविष्ट आहेत. पुनर्गठित आणि फेरपुनर्गठित कर्जांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. योजनेच्या नियमांनुसार 1 एप्रिल 2026 पासूनचे पुढील व्याज आणि इतर खर्च माफ करण्याची तरतूद आहे.



तिसरी यादी जाहीर


या तिसऱ्या यादीतील विभागनिहाय आकडेवारीनुसार, छत्रपती संभाजीनगर विभागातील 2,06,450, अमरावती विभागातील 85,076, नागपूर विभागातील 30,738, नाशिक विभागातील 14,244 आणि पुणे विभागातील 11,928 शेतकऱ्यांचा समावेश आहे. तसेच कोकण विभागातील 2,756 शेतकरी या यादीत आहेत.


पात्र शेतकऱ्यांना आपले नाव संबंधित बँकेच्या शाखेत, विविध कार्यकारी सेवा संस्थेत किंवा ग्रामपंचायतीत तपासता येणार आहे. त्यानंतर जवळच्या आपले सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी बायोमेट्रिक किंवा ओटीपीचा वापर करता येईल.


मयत, वयोवृद्ध तसेच बोटांचे ठसे न उमटणाऱ्या लाभार्थ्यांसाठीही विशेष कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी योजनेच्या नियमांनुसार आवश्यक माहिती घ्यावी. कर्जमुक्तीचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली पात्रता आणि कर्जखात्याची माहिती संबंधित बँकेत तपासून घ्यावी.


Comments
Add Comment

Pune water supply: पुणेकरांना मोठा धक्का! 15 ऑक्टोबरपासून दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद

पुणे : अपुऱ्या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी पुणे महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला

Maharashtra weather : महाराष्ट्रात 'ऑक्टोबर हिट'चा जोर वाढला; मुंबईसह कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा

महाराष्ट्रात सध्या उन्हाचा चटका वाढत असून, अनेक भागांत नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. ऑक्टोबर हिटचा

बंधपत्रित अधिपरिचारिकांच्या सेवा नियमित करण्यासाठी लवकरच महत्त्वाचा निर्णय, आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती

मुंबई: सार्वजनिक आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या बंधपत्रित अधिपरिचारिकांच्या सेवा नियमित करण्यासाठी लवकरच

Pune Water Cut: पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट, आठवड्यातून 'या' दिवशी राहणार पाणी पुरवठा बंद

पुणे: पावसाने दिलेली ओढ आणि आगामी पावसाबाबतची अनिश्चितता लक्षात घेऊन उपलब्ध पाणी साठ्याचे नियोजन करण्यासाठी

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

SIR यादीवर दावे- हरकती दाखल करण्यास मुदतवाढ, केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय

मुंबई: महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येत असलेल्या मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाला अर्थात SIR यादीला