Prithvi Shaw relationship : ‘माझी दिशाभूल झाली होती!’ साखरपुडा मोडल्यानंतर पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल पुन्हा एकत्र; नेमकं काय घडलं?

आता काही आठवड्यांतच दोघांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

Prithvi Shaw relationship : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आकृती अग्रवाल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काही महिन्यांपूर्वी साखरपुडा केलेल्या या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता दोघांनी आपापसातील मतभेद दूर करून पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आकृतीने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर करत आपल्या नात्याविषयी स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे दोघांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.



साखरपूडा झाल्यानंतर काही महिन्यांतच ब्रेकअप


पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांचा 8 मार्च रोजी साखरपुडा झाला होता. त्यानंतर 17 सप्टेंबर रोजी आकृतीने सोशल मीडियावर पोस्ट करत दोघे वेगळे होत असल्याची माहिती दिली होती. या घोषणेनंतर त्यांच्या नात्याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता काही आठवड्यांतच दोघांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.



इस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली


आकृतीने सोमवारी संध्याकाळी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने सांगितले की, साखरपुडा मोडण्याचा निर्णय घेताना जवळच्या काही लोकांच्या मतांचा तिच्यावर प्रभाव पडला होता. त्यामुळे तिने आपल्या नात्याकडे चुकीच्या दृष्टिकोनातून पाहिले. निर्णय घेण्यापूर्वी पृथ्वीशी मोकळेपणाने संवाद साधायला हवा होता, असेही तिने म्हटले.





या निर्णयाची आणि त्याच्या परिणामांची जबाबदारी स्वीकारत आकृतीने सांगितले की, त्यानंतर दोघांनी एकमेकांशी मनमोकळेपणाने चर्चा केली. एकमेकांना समजून घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा एकत्र येण्याचे ठरवले. यापुढे आपल्या नात्यात विश्वास, प्रेम आणि समजूतदारपणाला महत्त्व देणार असल्याचेही तिने स्पष्ट केले. त्यांच्या निर्णयाचा आदर करण्याची विनंती तिने चाहत्यांना केली आहे.


दरम्यान, पृथ्वी शॉनेही आकृतीची ही पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली. त्यासोबत त्याने हार्ट आणि नजर लागू नये, असा अर्थ दर्शवणारे इमोजी वापरले. तसेच दोघांचा साखरपुड्याचा फोटोही पुन्हा सोशल मीडिया अकाऊंटवर दिसत आहे.


आकृती अग्रवाल ही अभिनेत्री, फॅशन कंटेंट क्रिएटर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 3 मिलियनहून अधिक फॉलोअर्स असल्याचे सांगितले जाते. दोघांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या चाहत्यांचे लक्ष आता त्यांच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे.


Comments
Add Comment

Ramayan: भारतीय संस्कृतीचा जगभरात डंका, "रामायण " दिसणार आता 40 भाषांमध्ये

मुंबई : रामायण चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. रामायण चित्रपट हा 40

बॉक्स ऑफिस गाजवायला एकता कपूरचा The Dirty Picture चा सीक्वेल येतोय, मुख्य भूमिकेत विद्या बालन की आणखी कोण?

मुंबई: विद्या बालनच्या गाजलेल्या ‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली

Sunny Deol अंत से आरंभ तक...' सनी देओलच्या ॲक्शन चित्रपटाची घोषणा, 'सुर्या'मधील लूकने वेधलं लक्ष

मुंबई : सनी देओल यांनी आजपर्यंत घायल, दामिनी, बॉर्डर, गदर: एक प्रेम कथा, गदर 2, बॉर्डर 2 यांसारखे सुपरहिट चित्रपट केले.

Amitabh Bachchan Birthday: "यांच्या जागी नाना पाटेकर असते तर..." वाढदिवशी बिग बींचं कृत्य पाहून नेटकऱ्यांची प्रतिक्रिया; नेमकं काय घडलं?

मुंबई : काल 11 ऑक्टोबर रोजी, अमिताभ बच्चन यांनी आपला 84 वा वाढदिवस सेलिब्रेट केला. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या

आधुनिक विचार, नात्यांची गंमत अन् भावनांचा सुंदर मेळ असलेल्या ‘लग्न आणि बरंच काही’चा ट्रेलर आणि गाणी प्रदर्शित!

वेदांती चंद्रकांत दाणी दिग्दर्शित, नाद स्टुडिओस प्रस्तुत आणि अव्यान आर्ट्स आणि म्हाळसा एंटरटेनमेंट निर्मित

Marathi actor madhutai kambikar: ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन, मराठी कलाविश्वात पुन्हा एकदा शोककळा

मुंबई : ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधू कांबीकर यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन. १२ ऑक्टोबर २०२६ ला