लव्ह फिल्म्सने सहा नव्या चेहऱ्यांच्या जोड्यांचे आकर्षक पोस्टर्स प्रदर्शित केले आहेत. या पोस्टर्समधून चित्रपटातील धमाल केमिस्ट्री, तरुणाईचा उत्साह आणि हटके अंदाज पाहायला मिळत आहे. ‘पहला प्यार दूसरी बार’ या चित्रपटाच्या थिएटरमधील प्रदर्शनापूर्वीच त्याच्याबद्दल सर्वत्र उत्सुकता पाहायला मिळत आहे. अशातच प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटातील जोड्यांचे काही हटके आणि मजेशीर पोस्टर्स प्रदर्शित केले आहेत. या पोस्टर्समधून सहा नव्या कलाकारांच्या माध्यमातून धमाल, नाट्यमय आणि तरुणाईच्या प्रेमाची झलक पाहायला मिळते. हा बहुप्रतीक्षित चित्रपट २३ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मैत्री, विनोद, पहिला क्रश, मैत्रीतील घट्ट नातं आणि अनेक अनपेक्षित वळणांसह प्रेमाला मिळणारी दुसरी संधी, अशा अनेक गोष्टींची मजेशीर गुंफण या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
स्पर्श वालिया, अलीशा चोप्रा, कुणाल वैद, साक्षी वैद्य, तुषार छिब्बर आणि सरगुन कौर लूथरा या सहा नव्या चेहऱ्यांना प्रेक्षकांसमोर आणणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन पदार्पण करणारे दिग्दर्शक अनुज सैनी यांनी केले आहे. तर लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. निर्मात्यांनी प्रदर्शित केलेल्या सर्व नव्या पोस्टर्समध्ये कलाकारांच्या ऑन-स्क्रीन जोड्या धमाल पोझेस, बोलके आणि धाडसी दृश्यात्मक संकेत तसेच खोडकर अंदाजातून तरुणाईचा बेधडक रंग उलगडताना दिसत आहेत.
[https://www.instagram.com/p/DedpDgXjNf3/?srtk=YW0yaXB0czJ4eWM4](https://www.instagram.com/p/DedpDgXjNf3/?srtk=YW0yaXB0czJ4eWM4)
[https://www.instagram.com/p/DedozNxCOo9/?rpxt=eWsxemcwOHZxNHhm](https://www.instagram.com/p/DedozNxCOo9/?rpxt=eWsxemcwOHZxNHhm)
[https://www.instagram.com/p/Dedos6BDlXP/?cplk=MXd6ODJobXJ6bTV6aw==](https://www.instagram.com/p/Dedos6BDlXP/?cplk=MXd6ODJobXJ6bTV6aw==)
प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टर्समधील प्रत्येक जोडी आपापल्या खास अंदाजाने लक्ष वेधून घेत आहे. एका पोस्टरमध्ये कुणाल वैद आणि साक्षी वैद्य धमाल पिगीबॅक पोझ देताना दिसत असून, त्यांची ही मस्तीभरी केमिस्ट्री प्रेक्षकांची मने जिंकत आहे. या दोघांची जोडी मजेशीर आणि एकमेकांना आव्हान देणारी वाटते. दुसऱ्या पोस्टरमध्ये अलीशा चोप्राने स्पर्श वालियाला चमकदार पिवळ्या रंगाच्या ‘CAUTION’ टेपमध्ये गुंडाळले आहे. प्रेमसंबंधांमधील परिचित ‘रेड फ्लॅग्स’ या संकल्पनेला तिने एका खोडकर आणि हटके दृश्यात्मक रूपात सादर केले आहे. याशिवाय, उत्साहाने भरलेल्या आणि बेफिकीर अंदाजातील एका पोस्टरमध्ये तुषार छिब्बरने सरगुन कौर लूथराला आपल्या खांद्यावर उचलून घेतले आहे. हे पोस्टर्स चित्रपटाचा बेधडक अंदाज, मजेशीर नोकझोक आणि नात्यांमधील खास समीकरणे अधोरेखित करतात, जी तरुणाईच्या प्रेमसंबंधांना अधिक रंजक बनवतात.
लव रंजन, जहान हांडा आणि अनुज सैनी यांनी लेखन केलेला ‘पहला प्यार दूसरी बार’ हा चित्रपट आजच्या काळाशी सुसंगत अशी रोमँटिक कॉमेडी सादर करतो. विनोदाची खुमासदार फोडणी देत प्रेम आणि मैत्रीतील गुंतागुंत, तसेच त्यांच्याशी जोडलेली रंजक वास्तवता या चित्रपटातून उलगडणार आहे. नवी कलाकारांची फळी, दमदार संगीत आणि आधुनिक प्रेमाची हटके मांडणी यांचा संगम असलेला हा चित्रपट रुपेरी पडद्यावर तरुणाईच्या दिवसांतील धमाल आणि मनोरंजनाची मेजवानी घेऊन येण्यास सज्ज आहे. ‘पहला प्यार दूसरी बार’ हा चित्रपट २३ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.