Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरात वातावरण तापलं! नकुलसाठी आसिफवर चिडली लव्ह; यंग आणि स्काऊटमध्ये सुद्धा बाचाबाची

Bigg Boss 20 च्या घरात नेहमीच काहीना काही रंजक गोष्टी घडत असतात. अनेकदा स्पर्धकांमध्ये भांडणं होतात. कधी कधी तर ही भांडणं मारामारीपर्यंत जातात. यावेळी सुद्धा असंच काहीसं घडलंय.नुकतेच वाइल्ड कार्ड स्पर्धक नकुल धुल आणि गुल्लू यांच्यातील भांडणानंतर आता घरात एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. आगामी भागाचा एक प्रोमो समोर आला असून, यामध्ये आसिफ खान आणि लव गिल यांच्यात तीव्र वाद पाहायला मिळणार आहे.

समोर आलेल्या प्रोमोनुसार, लव गिल ही नकुल धुलजवळ बसलेली असते, ज्यावर आसिफ खान संताप व्यक्त करतो. आसिफ थेट लव्हला जाब विचारतो की ती नकुलच्या शेजारी का बसली आहे आणि हे त्याला अजिबात आवडलेले नाही.
यावर उत्तर देताना लव स्पष्ट करते की तिने नकुलसोबत कोणतीही चुकीची चर्चा केलेली नाही. मात्र, आसिफ तिचे काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो आणि तो नकुलसोबत बसल्याबद्दल लववर आक्रमक होतो. या वादानंतर दोघांमध्ये जोरदार बाचाबाची होते आणि दोघेही एकमेकांवर ओरडू लागतात. या वादादरम्यान आसिफ रागाच्या भरात लवला 'चापलूस' आणि 'गवार' असे शब्दही बोलून जातो. घरातील इतर सदस्य मध्यस्थी करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसतात.






स्काउट आणि यंग यांच्यातही मतभेद


या संपूर्ण प्रकरणामुळे घरातील इतर सदस्यांमध्येही दुरावा निर्माण होत असल्याचे दिसत आहे. आणखी एका प्रोमोमध्ये, यंग हा स्काउटकडे तक्रार करताना दिसतो की तो नकुलचे समर्थन का करत आहे. यंग लव्हला देखील समजावण्याचा प्रयत्न करतो की तिने नकुलच्या जवळ बसू नये. मात्र, स्काउट लव्हची बाजू घेतो, ज्यामुळे यंग आणि स्काउट यांच्यातही वाद सुरू होतो. यावर लव्ह देखील स्काउटवर संताप व्यक्त करते आणि स्पष्टपणे सांगते की तिला कोणीही सांगणार नाही की तिने काय करावे आणि काय नाही. घरामध्ये नकुलच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद आता इतर सदस्यांमधील नातेसंबंध बिघडवताना दिसत आहे. आगामी एपिसोडमध्ये हा वाद आणखी किती टोकाला जातो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Comments
Add Comment

Paro Film : ‘पारो: वधू गुलामगिरीची अज्ञात कहाणी’ चित्रपट लवकरच; वधू तस्करीचा विषय मांडणारा नवा सिनेमा

महिलांची वधू म्हणून खरेदी-विक्री आणि त्यातून होणारे शोषण या गंभीर सामाजिक समस्येवर भाष्य करणारा ‘पारो: वधू

शिक्षकांच्या संघर्षाची गोष्ट सांगणारा ‘कबीर सर का आखरी लेसन’ इफ्फीमध्ये झळकला

काळ बदलला, वर्ग बदलले, फळ्याची जागा स्मार्ट बोर्डने घेतली. पण या बदलत्या काळात अनेक पिढ्या घडवणारे शिक्षक मात्र

Fulwara Marathi Movie: 'फुलवरा'चा लावणीसाज! वैदेही परशुरामी आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या नव्या लूकची चर्चा

Fulwara Marathi Movie: रवी जाधव दिग्दर्शित आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या ‘फुलवरा’ या चित्रपटाची उत्सुकता आता

Tu Aahes Na: इफ्फीच्या मंचावर मराठी चित्रपटाची भावुक झलक! ‘तू आहेस ना’ला प्रेक्षकांचा प्रतिसाद

Tu Aahes Na: गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) येथे लव फिल्म्स फिल्म्सची

ऑस्कर 2027 च्या शर्यतीत 2 भारतीय चित्रपट! 'गोंधळ' आणि 'अँग'ने मिळवली पात्रता

Oscars 2027 : भारतीय चित्रपट 'गोंधळ' आणि 'अंग' यांनी ऑस्कर 2027 च्या शर्यतीत प्रवेश केला आहे. 'गोंधळ'ला आंतरराष्ट्रीय फीचर

Dhadkan Sequel: 26 वर्षांनंतर 'धडकन 2' येणार? अक्षय-शिल्पाच्या जागी दिसणार नवी जोडी!

Dhadkan 2 : सध्या बॉलिवूडमध्ये अनेक गाजलेल्या चित्रपटांचे सिक्वेल आणि रिमेक बनवण्याचा ट्रेंड पाहायला मिळतोय. 90 च्या