Thursday, October 15, 2026

मंत्रोच्चाराच्या घोषात त्र्यंबकेश्वर येथे विधिवत ध्वजस्तंभ पूजन, 31 फूट उंच भव्य ध्वजस्तंभाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पूजन; पाहा खास क्षण

ध्वजस्तंभाची उंची ३१ फूट आहे. समुद्र मंथनाची संकल्पना ध्वजस्तंभावर साकारण्यात आली आहे. मंथनातून प्राप्त रत्ने ध्वजावर आहेत. खालील भागात श्री गणेशाची प्रतिमा साकारली आहे. सर्वात वरील भागात अमृत कलश धारी गरुडाची प्रतिमा आहे.

1/7 त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विधिवत ध्वजस्तंभ पूजन करण्यात आले. 2/7 मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींच्या वातावरणात ध्वजस्तंभ पूजन सोहळा उत्साहात पार पडला.   3/7 आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला त्र्यंबकेश्वर येथे वेग आला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भाविकांच्या गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यावर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भर दिला.   4/7 कुंभमेळ्याशी संबंधित सर्व विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. भाविकांना सुरक्षित आणि सुव्यवस्थित सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन करण्यात आले.   5/7 राष्ट्रपतींच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांना आवश्यक तयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.   6/7 ध्वजस्तंभावर समुद्रमंथनाची संकल्पना साकारण्यात आली असून, त्यावर मंथनातून प्राप्त रत्नांची कलात्मक मांडणी करण्यात आली आहे. ३१ फूट उंच ध्वजस्तंभाच्या खालील भागात श्री गणेशाची, तर शीर्षस्थानी अमृतकलशधारी गरुडाची प्रतिमा साकारण्यात आली आहे.   7/7 ध्वजस्तंभ पूजन सोहळ्याची सांगता गंगा आरतीने झाली; यावेळी लोकप्रतिनिधी, साधू-संत, महंत आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक परंपरा आणि श्रद्धेचा संगम असलेल्या या सोहळ्याच्या माध्यमातून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वरमधील नियोजनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >