Thursday, October 15, 2026

Nashik Kumbh Mela : कुशावर्त तीर्थावर ३१ फूट उंच भव्य ध्वजस्तंभाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पूजन

Nashik Kumbh Mela : : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगरीतील कुशावर्त तीर्थ येथे ३१ फूट उंच भव्य सिंहस्थ ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. या ध्वजस्तंभाचे पूजन आज नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या या ध्वजस्तंभामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे.

ध्वजस्तंभाची आकर्षक रचना

या ध्वजस्तंभाची रचना आकर्षक पद्धतीने करण्यात आली असून, स्टीलच्या पाईपवर ६२ किलो पितळाचा मुलामा देण्यात आला आहे. त्यामुळे ध्वजस्तंभाला भव्य आणि देखणे स्वरूप प्राप्त झाले आहे. कुशावर्त तीर्थाच्या धार्मिक महत्त्वाला साजेशी कलाकुसर या ध्वजस्तंभात करण्यात आली आहे. ध्वजस्तंभावर समुद्रमंथनातील चौदा रत्नांचे चित्रण, अमृतकलश धारण केलेल्या गरुडाची प्रतिमा तसेच गणेशाच्या प्रतिमांचा समावेश करण्यात आला आहे. या धार्मिक प्रतीकांमुळे ध्वजस्तंभाला विशेष सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वरमध्ये विविध विकासकामे आणि धार्मिक सुविधांच्या उभारणीवर भर दिला जात आहे. कुशावर्त तीर्थावरील या भव्य ध्वजस्तंभामुळे परिसराच्या धार्मिक वैभवात भर पडणार असून, भाविकांसाठीही तो विशेष आकर्षण ठरण्याची अपेक्षा आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेला हा ध्वजस्तंभ त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक परंपरेचे आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >