Nashik Kumbh Mela : कुशावर्त तीर्थावर ३१ फूट उंच भव्य ध्वजस्तंभाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पूजन

Nashik Kumbh Mela : : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगरीतील कुशावर्त तीर्थ येथे ३१ फूट उंच भव्य सिंहस्थ ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. या ध्वजस्तंभाचे पूजन आज नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या या ध्वजस्तंभामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे.





ध्वजस्तंभाची आकर्षक रचना


या ध्वजस्तंभाची रचना आकर्षक पद्धतीने करण्यात आली असून, स्टीलच्या पाईपवर ६२ किलो पितळाचा मुलामा देण्यात आला आहे. त्यामुळे ध्वजस्तंभाला भव्य आणि देखणे स्वरूप प्राप्त झाले आहे. कुशावर्त तीर्थाच्या धार्मिक महत्त्वाला साजेशी कलाकुसर या ध्वजस्तंभात करण्यात आली आहे. ध्वजस्तंभावर समुद्रमंथनातील चौदा रत्नांचे चित्रण, अमृतकलश धारण केलेल्या गरुडाची प्रतिमा तसेच गणेशाच्या प्रतिमांचा समावेश करण्यात आला आहे. या धार्मिक प्रतीकांमुळे ध्वजस्तंभाला विशेष सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.


सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वरमध्ये विविध विकासकामे आणि धार्मिक सुविधांच्या उभारणीवर भर दिला जात आहे. कुशावर्त तीर्थावरील या भव्य ध्वजस्तंभामुळे परिसराच्या धार्मिक वैभवात भर पडणार असून, भाविकांसाठीही तो विशेष आकर्षण ठरण्याची अपेक्षा आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेला हा ध्वजस्तंभ त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक परंपरेचे आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक ठरणार आहे.


या पूजन सोहळ्यास आमदार हिरामण खोसकर, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, उपनगराध्यक्ष पल्लवी शिरसाट, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, सहायक धर्मदाय आयुक्त विवेक सोनुने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपविभागीय अधिकारी डॉ. पवन दत्ता, तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी श्र. सानप, मुख्याधिकारी गोविंद जाधव, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, नाशिक पुरोहित संघाचे सतीश शुक्ल यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध आखाड्यांचे प्रमुख, साधू, संत, महंत, भाविक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

BMC Health Policy : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य योजनांचा लाभ, नागरी आरोग्य धोरणाचा मसुदा सार्वजनिक आरोग्य समितीसमोर सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) BMC Health Policy : निरोगी मुंबई आणि भविष्यकालीन सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिकेने नागरी आरोग्य

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला

Uttar Pradesh Viral video : हुंड्याच्या हव्यासापोटी मागितली थेट 'महिंद्रा थार'; वधूच्या कुटुंबीयांनी भरमांडवात दाखवला आरसा!

Uttar Pradesh Viral video: हुंड्याच्या मागणीला उत्तर देण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी अनोखी शक्कल लढवल्याची घटना उत्तर

Solapur Crime News: आईला त्रास देत असल्याच्या रागातून भावानेच भावाचा कुऱ्हाडीने वार करून खून; सोलापुरातील घटना

Solapur Crime News: सोलापूर शहरातील उमा नगरी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास भावानेच भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये 3,028 कोटींचा पॉड टॅक्सी प्रकल्प; हर की पौरी, मनसा देवीसह प्रमुख ठिकाणे जोडणार

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू