Thursday, October 15, 2026

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका आता रंगतदार वळणावर आली आहे. या मालिकेत 2-2 अशी बरोबरी आहे. त्यामुळे पाचवा सामना जिंकणारा संघच मालिका खिशात घालणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी करो या मरोची स्थिती आहे.

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. त्यामुळे भारत वेस्ट इंडिजला या मालिकेत सहज पराभूत करेल असं वाटलं होतं. पण वेस्ट इंडिजने चार सामन्यानंतर मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे पाचव्या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. पाचवा सामना जिंकणारा संघच मालिका खिशात घालणार आहे. असं असताना कर्णधार श्रेयस अय्यरने चौथ्या सामन्यात केलेल्या चुकांचा अभ्यास केला आहे. आता या चुका पाचव्या सामन्यात होणार नाही, याची काळजी घेणार असल्याचं सांगितलं आहे. कारण या चुकांमुळेच चौथ्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. श्रेयस अय्यरने पाचव्या सामन्यात कसा विजय मिळवणार? याचं गणितच थोडक्यात सांगून टाकलं. त्याने हे वक्तव्य चौथ्या टी20 सामन्यातील पराभवानंतर केलं होतं.

काय म्हणाला होता श्रेयस अय्यर?

वेस्ट इंडिजविरुद्ध चौथ्या टी20 सामन्यात पराभव झाल्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला की, आमची पद्धत तीच असेल जी आजपर्यंत तुम्ही पाहिली आहे. आम्हाला खेळाच्या स्वरूपात काही बदल करण्याची गरज नाही. गोलंदाजीबद्दल श्रेयस अय्यर स्पष्ट म्हणाला की, आपण त्याबद्दलही जास्त विचार करायला नको. बंगळूरुमध्ये गोलंदाजांना एकच गोष्ट करण्याची गरज आहे, जी त्यांनी हैदराबादमध्ये केली नाही, ती म्हणजे आपल्या योजनांची अचूक अंमलबजावणी करणे. त्यांना योग्य टप्प्यावर आणि दिशेला गोलंदाजी करणे आवश्यक आहे. जर आपण ही मानसिकता अंगीकारली, तर आपण विजय निश्चित होऊ शकतो.

पाचवा टी20 सामना कसा जिंकणार?

बंगळुरूतील निर्णायक टी20 सामनयात कर्णधार श्रेयस अय्यरच्या म्हणण्याप्रमाणे योग्य अमलबजावणी केली जर विजय निश्चित आहे. म्हणजे फलंदाजीत त्याला कोणतीच उणीव दिसली नाही. पण गोलंदाजांना आपल्या योजनांवर काम करावं लागणार आहे. गोलंदाजांनी वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाजी करताना अवांतर धावा दिल्या. तसेच अचूक टप्प्याची गोलंदाजी करण्यात चूक केली. त्यात गोलंदाजी करण्यात दिरंगाई केल्याने शेवटच्या षटकात फक्त चार क्षेत्ररक्षक बाहेर होते. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना मोकळं रान मिळालं. शाई होपने शेवटच्या दोन चेंडूंवर उत्तुंग षटकार मारले आणि शतक साजरं केलं.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >