प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर भारतीय बाजारात महिंद्रा कंपनीने आपल्या ताफ्यात सीएनजी गाडी लाँच केली आहे. XUV 3XO CNG ही नवीन सीएनजी गाडी महिंद्राने नुकतीच लाँच केली आहे. जिला ZNG असे नाव देण्यात आले आहे. या गाडीची किंमत ९.९९ लाख रुपयांपासून सुरु होणार असून यातील फॅक्टरी फिटेड CNG मॉडेल हे चार वेगवेगळ्या प्रकारांत आहेत. हे चार प्रकार MX EDGE, REVX EDGE (O), AX5 आणि REVX A आहेत. यापैकी सर्वात टॉपच्या व्हेरिएन्टची किंमत १२.२७ लाख रुपये इतकी आहे. या कॉम्पॅक्ट SUV मध्ये फ्लोअरखाली बसवलेले ड्युअल सिलेंडर CNG इंजिन आणि २०० Nm टॉर्क निर्माण करणारे टर्बोचार्ड बायोफ्युएल इंजिन आहे.
XUV 3XO CNG मध्ये लगेज कंपार्टमेंटच्या खाली, प्रत्येक बाजूला एक असे दोन सिलेंडर आहेत, ज्यामुळे टाक्यांच्या वर सामान ठेवण्यासाठी भरपूर जागा मिळते. महिंद्राने पेट्रोल आणि सीएनजीमध्ये बदल करण्यासाठी केबिनमध्ये एक स्वतंत्र असा इंधन निवड स्वीच दिलेला आहे. ही दोन-सिलेंडर रचना सिंगल-सिलेंडर रचनेला एक पर्याय देते, जी सामान्यतः बूट स्पेसचा मोठा भाग व्यापते.
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास ...
हि नवीन लाँच झालेली एसयूव्ही महिंद्राच्या १.२ लिटर MPFI (मल्टी-पॉइंट फ्युएल इंजेक्शन) टर्बो-पेट्रोल इंजिनसोबत सीएनजी किटचा पर्याय देत आहे. पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही मोडमध्ये कमाल आउटपुट १११ एचपी आणि २०० एनएम आहे. महिंद्राच्या म्हणण्यानुसार, ऑप्टिमाइझ्ड टर्बोचार्जर कॅलिब्रेशन आणि ईसीयु मॅपिंगमुळे हे शक्य झाले आहे. सीएनजी कमी झाल्यावर ही प्रणाली आपोआप पेट्रोल मोडवर स्वीटच होऊ शकते. ट्रान्समिशनसाठी ६ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स असून २४.७ किमी/ किलो मायलेजचा दावा केला आहे.
या गाडीमध्ये मजबूत सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये सहा एअरबॅग्ज, चार डिस्क ब्रेक, टॉप टेदरसह ISOFIX चाईल्ड सीट अँकरेजेस आणि सर्व प्रवाशांसाठी थ्री पॉईंट सीटबेल्ट यांचा समावेश आहे. प्रत्येक सिटीसाठी सीटबेल्ट रिमाइंडची सोय आहे आणि पॅसेंजर एअरबॅग सक्रिय करण्याचे फंक्शनदेखील उपलब्ध आहे. ही एसयूव्ही ३५० मिमी पर्यंतच्या पाण्यातून जाऊ शकते आणि तिचा अप्रोच अँगल २३.६ डिग्री आहे.