Nashik Crime : '...तर तुम्हालाही धर्मांतर करावे लागेल' कुटुंबियांना धमकी ; 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, धर्मांतरासाठी दबाव अन्... नाशिकमध्ये खळबळ

Nashik Crime : नाशिकमध्ये एक अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटक करून तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणल्याचा धक्कादायक प्रकार  उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. आरोपी नोमाण अन्सारी या तरुणाने या चिमुकलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप आहेत.


या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला मालेगाव येथून बेड्या ठोकल्या आहेत.



नेमकं प्रकरण काय ?


पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी नोमाण अन्सारी याने 13 वर्षीय अल्पवयीन पीडितेचे लैंगिक शोषण केले. एवढ्यावरच न थांबता त्याने धर्मांतर करण्यासाठी तिला जबरदस्तीने हिजाब (Hijab) घालायला लावून नमाज पठण करायला लावले. संतापजनक म्हणजे या सर्व प्रकारांचे आणि लैंगिक शोषणाचे फोटो व व्हिडीओ आरोपीने स्वतःच्या मोबाईलमध्ये शूट केले होते. हे आक्षेपार्ह फोटो आणि नमाज पठणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपी नोमाण हा पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाला देत होता.



...तर तुम्हालाही धर्मांतर करावे लागेल


आरोपानुसार, आरोपीची अरेरावी एवढ्यावरच थांबली नाही, तर त्याने पीडित मुलीच्या कुटुंबालाही थेट धमकी दिली. "तुमच्या मुलीशी लग्न करून तिला दिल्लीला घेऊन जाईन आणि तिचे धर्मांतर करेन. जर तुम्ही विरोध केला, तर तुम्हालाही धर्मांतर करावे लागेल, अन्यथा सर्व फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल करेन," अशी धमकी आरोपीने दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.


वारंवार दिल्या जाणाऱ्या धमक्यांमुळे अखेर कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. उपनगर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ कारवाई करत आरोपी नोमाण अन्सारी याला मालेगाव (Malegaon) येथून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीचा आणि पीडित मुलीचा मोबाईल जप्त केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

Ashish Shelar: दिवंगत नाना पाटेकरांना भाजपने दिली होती लोकसभा लढवण्याची ऑफर, मंत्री आशिष शेलार यांचा दावा

 देवेंद्र फडणवीसांसोबत स्वतः भेट घेतल्याची सांगितली आठवण मुंबई : दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांना भाजपकडून

New Mahindra Car Launch: महिंद्राची नवी CNG SUV बाजारात! पाहा किंमत, फीचर्स आणि मायलेज

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर भारतीय बाजारात महिंद्रा कंपनीने आपल्या ताफ्यात सीएनजी गाडी लाँच केली आहे. XUV 3XO CNG ही

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सामना पराभवाचा वेग काही भलताच, आतापर्यंत सर्व भारतीय कर्णधारांना टाकलं मागे

[caption id="attachment_1066530" align="aligncenter" width="800"] वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिका विजयाचं गणित

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून