‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या शक्तीचा आणि नवचैतन्याचा जागर केला जातो, त्याच मंगलपर्वात अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि मीरा वेलणकर या दोन मैत्रिणींच्या सर्जनशील सहप्रवासाचा नवा अध्याय सुरू होत आहे. २५ वर्षांच्या मैत्रीचा धागा जपत, अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि मीरा वेलणकर आता नाट्यनिर्मितीच्या नव्या प्रवासासाठी एकत्र आल्या आहेत. अभिनेत्री म्हणून एकत्र काम केलेल्या या दोघी ‘पुन्हा नक्की भेटू’ या नाटकाच्या निमित्ताने पहिल्यांदाच निर्मात्या म्हणून एकत्र येत आहेत. शुक्रवार २३ ऑक्टोबरला नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे.

अभिनय, दिग्दर्शन आणि जाहिरात क्षेत्रातील अनुभव गाठीशी असलेल्या मीरा वेलणकर यांचं नाट्यनिर्मितीच्या क्षेत्रातील हे पहिलंच पाऊल आहे. या नव्या सर्जनशील प्रवासातून ‘रंगमाया’ या नव्या नाट्यसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. विशेष म्हणजे मुक्ताला या नाटकाची संहिता बाहेर कुठे नव्हे, तर आपल्याच घरात, आपल्या भावाच्या लेखणीत सापडली! कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असलेल्या देबू बर्वे यांनी नाटकाचं लेखन केलं आहे. मीरा वेलणकर यांनी दिग्दर्शन केलं असून, ‘रंगमाया’ आणि ‘अष्टविनायक’ या संस्थांनी ‘पुन्हा नक्की भेटू’ नाटकाची निर्मिती केली आहे. मुक्ता बर्वे, मीरा वेलणकर आणि दिलीप जाधव हे या नाटकाचे निर्माते आहेत. प्रदीप मुळ्ये यांनी नेपथ्य व प्रकाशयोजनेची जबाबदारी सांभाळली असून, श्रीनाथ म्हात्रे यांनी संगीताची धुरा सांभाळली आहे.



नाटकात मुक्ता बर्वे यांच्यासोबत प्रियदर्शन जाधव, अंशुमन विचारे आणि आरती वडगबाळकर हे कलाकार दिसणार आहेत. या नव्या नाट्यप्रवासाबद्दल मुक्ता बर्वे म्हणाल्या, “मैत्रीण म्हणून मीरा खूप छान आहेच; पण दिग्दर्शिका म्हणून तिच्यासोबत काम करणं हा माझ्यासाठी समृद्ध करणारा आणि खूप काही शिकवणारा अनुभव आहे. नाटक हाताळताना तिच्यातील कलात्मक दृष्टी आणि संवेदनशीलता प्रकर्षाने जाणवते. या नाटकाच्या तालमीदरम्यान मला मिळालेला फिडबॅकही माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. ‘या नाटकात तुम्ही खूप वेगळ्या दिसता,’ अशी प्रतिक्रिया मला मिळाली. मला नेहमीच वाटतं की, कलाकारामधले वेगळे पैलू ओळखून ते प्रेक्षकांसमोर आणणारा दिग्दर्शक मिळणं महत्त्वाचं असतं. मीराची दिग्दर्शिका म्हणून मला ती साथ मिळाली आहे. माझी बलस्थानं ओळखून, माझ्यातील सर्वोत्तम गोष्टी बाहेर काढण्याची ताकद तिच्यात आहे. तिची कलात्मक दृष्टी आणि विचार करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. तिच्या या वेगळेपणाचा प्रत्यय ‘पुन्हा नक्की भेटू’ या नाटकातून प्रेक्षकांना नक्कीच येईल, असा मला विश्वास आहे.”

“कोणतंही काम सुंदर होण्यासाठी एकमेकांवरचा विश्वास आणि परस्परांची साथ खूप महत्त्वाची असते. मुक्ता आणि दिलीप जाधव सरांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी खास आहे. मुक्ता आणि मी याआधी एकत्र काम केलं असलं, तरी यावेळी निर्माते म्हणून एकत्र येणं हा वेगळाच अनुभव आहे. आमच्यातला छान समन्वय आणि एकमेकांना दिलेली साथ यामुळे नाटक करताना खूप मजा आली. हाच आनंद प्रेक्षकांपर्यंतही पोहोचेल, हा विश्वास दिग्दर्शिका मीरा वेलणकर यांनी व्यक्त केला.
Comments
Add Comment

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’

Drishyam : ‘दृश्यम 3' चा बॉक्स ऑफिसवर जलवा ! आता 'दृश्यम 4’ येणार ? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं...

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपट मालिकेने प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. रहस्य, थरार

Koffee with Karan: - "मेरे करण अर्जुन आएंगे..." निर्माता करण जोहर नवा चित्रपट आणण्याच्या तयारीत...

चित्रपट निर्माता करण जोहरयाने आजवर वेगवेगळ्या कार्यक्रमातून चाहत्याची मने जिंकली आहेत. आता करण जोहर 'कॉफी विथ

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरात वातावरण तापलं! नकुलसाठी आसिफवर चिडली लव्ह; यंग आणि स्काऊटमध्ये सुद्धा बाचाबाची

Bigg Boss 20 च्या घरात नेहमीच काहीना काही रंजक गोष्टी घडत असतात. अनेकदा स्पर्धकांमध्ये भांडणं होतात. कधी कधी तर ही भांडणं

Koffee With Karan Season 9: करण जोहरच्या शोचा अखेरचा सीझन; पुन्हा रंगणार सेलिब्रिटींचा बेधडक अंदाज?

मुंबई : लोकप्रिय सेलिब्रिटी चॅट शो ‘कॉफी विथ करण’चा नववा सीझन प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. करण जोहर होस्ट करत