
जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि क्रांतीकारी फीचर लाँच केले आहे. या नवीन फीचरचे नाव ‘गेस्ट कॉल’ (Guest Call) असे आहे. या फीचरची सर्वात मोठी खास बाब म्हणजे, आता समोरच्या व्यक्तीच्या फोनमध्ये व्हॉट्सॲप ॲप नसले किंवा त्यांचे व्हॉट्सॲपवर अकाउंट नसले, तरीही तुम्ही त्यांच्याशी थेट व्हिडिओ किंवा व्हाईस कॉलद्वारे संवाद साधू शकणार आहात.
‘गेस्ट कॉल’ फीचरची मुख्य वैशिष्ट्ये
मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त भागांना केंद्र सरकारकडून आवश्यक मदत मिळावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी ...
- या कॉलिंग सेवेसाठी युझर्सकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
- या कॉलवर बोलण्यासाठी कोणतीही टाईम लिमिट (Time Limit) नसेल, तुम्ही हवा तितका वेळ संवाद साधू शकता.
- नेहमीच्या व्हॉट्सॲप कॉल्सप्रमाणेच हे गेस्ट कॉल्ससुद्धा ‘एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड’ (End-to-End Encrypted) असतील. म्हणजेच तुमचे संभाषण पूर्णपणे खाजगी आणि सुरक्षित राहील.
- हे फीचर एका व्यक्तीशी बोलण्यासाठी तसेच ग्रुप कॉलिंगसाठीही वापरता येईल.
- कॉल दरम्यान युझर्सना स्क्रीन शेअरिंग (Screen Sharing) करणे आणि इमोजीद्वारे रिॲक्शन्स (Emoji Reactions) देणे अशा सुविधाही मिळतील.
Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखलनालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुण मुलींना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या ...
सुरक्षा आणि प्रायव्हसीची विशेष काळजी
१. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला परस्पर कॉलला जोडता येणार नाही.
२. जो युझर कॉल लिंक तयार करेल, त्याच्या मंजुरीशिवाय (Approval) गेस्ट युझर कॉलवर येऊ शकणार नाही.
३. जर समोरच्या व्यक्तीला कॉल जॉईन करायचा नसेल, तर ती प्राप्त झालेली लिंक दुर्लक्षित (Ignore) करू शकते.
४. कॉल सुरू असताना host (कॉल सुरू करणारा) गरज वाटल्यास कोणत्याही गेस्ट युझरला एका क्लिकवर कॉलमधून बाहेर (Remove) काढू शकतो.
गेस्ट कॉल कसा सुरू करावा ? (स्टेप-बाय-स्टेप पद्धत)
१. कॉल टॅबवर जा: सर्वात आधी मोबाईलमधील व्हॉट्सॲप उघडून 'Calls Tab' वर क्लिक करा. २. प्लस आयकॉन: तिथे वरच्या बाजूला दिलेल्या '+' (Plus) चिन्हावर क्लिक करा. ३. लिंक जनरेट करा: त्यावर क्लिक करताच एक Call Link तयार होईल. ४. लिंक शेअर करा: ही लिंक तुम्ही एसएमएस (SMS), ईमेल किंवा इतर कोणत्याही माध्यमातून समोरच्या व्यक्तीला पाठवू शकता.
५. थेट संवाद: समोरची व्यक्ती कोणत्याही ॲपची किंवा अकाउंटची गरज न उरता, फक्त त्या लिंकवर क्लिक करून ब्राऊजरद्वारे (Browser) थेट तुमच्या कॉलमध्ये सहभागी होऊ शकेल. गूगल मीट (Google Meet) आणि झूम (Zoom) सारख्या कॉलिंग प्लॅटफॉर्म्सना टक्कर देण्यासाठी व्हॉट्सॲपचे हे नवीन ‘गेस्ट कॉल’ फीचर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.




