Thursday, October 15, 2026

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुण मुलींना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी आरीफ शेख याच्याविरोधात पोलिसांनी एकूण चार गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुण मुलींना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी आरीफ शेख याच्याविरोधात पोलिसांनी एकूण चार गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आरीफ शेख हा डेटिंग ॲप्सवर आपले आकर्षक फोटो अपलोड करून १७ ते २२ वयोगटातील तरुण मुलींना लक्ष्य करायचा. तो गोडगोड बोलून आणि विविध आमिषे दाखवून या तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. त्यानंतर तो तरुणींचे शोषण करत असल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे. आरीफवर तीन गुन्हे लैंगिक अत्याचाराचे असून, एक गुन्हा धार्मिक भावना दुखावल्याचा दाखल करण्यात आला आहे.

अश्लील व्हिडिओ परदेशात पाठवल्याचा संशय

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्या हाती आणखी एक संतापजनक माहिती लागली आहे. आरोपी आरीफ याने पीडित तरुणींचे परस्पर अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले होते आणि हे व्हिडिओ त्याने परदेशात पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सध्या या प्रकरणाची व्याप्ती वाढली असून पोलीस अधिक कसून चौकशी करत आहेत.

पोलिसांचे मोठे आवाहन

आरोपी आरीफ शेख याला न्यायालयाने १० ऑक्टोबरपासून शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन, पालघर पोलिसांनी एका महत्त्वाचा संदेश दिला आहे. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, जर या नराधमाचे इतरही कोणी बळी ठरले असतील, तर त्यांनी कोणत्याही दबावाखाली न येता पुढे यावे आणि पोलिसांकडे न घाबरता तक्रार नोंदवावी. प्रशासनाकडून पीडितांना पूर्ण सुरक्षा आणि न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >