Friday, October 16, 2026

Weather Alert: हवामानाचा मोठा इशारा! उद्या 16 राज्यांत पावसाचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Weather Alert News: हवामान विभागाने पुन्हा एकदा उद्या वर्तवलेल्या अंदाजानुसार, उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार आणि झारखंडसह 16 राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

देश: हवामान विभागाने पुन्हा एकदा 16 राज्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 17 ऑक्टोबर रोजी अर्थात उद्या उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार आणि झारखंडसह 16 राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ताशी 80 किलोमीटर वेगापर्यंतच्या सोसट्याच्या वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे. डोंगराळ भागातील परिसरांना भूस्खलनाचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, छत्तीसगड, ओडिशा, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये तीव्र वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तीन राज्यांसाठी हिमवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. याशिवाय, पूर्व भारतातील राज्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो. दक्षिण भारतात 22 ऑक्टोबरपर्यंत पावसामुळे हाहाकार माजण्याची शक्यता आहे. दरम्यान, पावसामुळे उत्तर भारतातील तापमान 5 ते 6 अंशांनी कमी होण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरातील वादळे पूर्व भारतीय राज्यांना धडकण्याची शक्यता असून, तीनपेक्षा जास्त राज्यांमध्ये गारपिटीची शक्यता आहे. दक्षिण हरियाणा आणि लगतच्या उत्तर राजस्थानवर वरच्या परिसरात चक्रीय वाऱ्यांची रचना तयार होत आहे. याव्यतिरिक्त, खालच्या ट्रोपोस्फियरमध्ये दक्षिण किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि आसपासच्या भागांवर वरच्या थरात चक्रीय वाऱ्यांची रचना आहे. उत्तर हरियाणा आणि आसपासच्या भागांवरही चक्रीय वाऱ्यांची रचना तयार होत आहे. उद्या, 17 ऑक्टोबर रोजी कोणकोणत्या राज्यात मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने नोंदवला आहे, जाणून घेऊया... हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उद्या, 17 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू- काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा आणि केरळ या 16 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर, ताशी 80 किलोमीटर वेगापर्यंतच्या सोसाट्याच्या वाऱ्यांचा इशाराही देण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ शकते.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उद्या, 17 ऑक्टोबर रोजी दिल्लीत पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ताशी 40 किलोमीटर वेगापर्यंत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. उद्या दिल्लीत कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा आहे. दरम्यान, लखनौमध्ये उद्या कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. बिहार राज्याकरिता उद्या मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पाटणामध्ये उद्या कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहील. झारखंड राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ताशी 50 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

उत्तराखंड राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात उत्तराखंडमधील डोंगराळ भाग असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये वारे ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश राज्यातील डोंगराळ भागात मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ताशी 55 ते 60 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासाठी तीव्र वादळाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, मनालीमध्ये उद्या कमाल तापमान 4 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान उणे 5 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. जम्मू- काश्मीर मधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ताशी 55 ते 60 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. उद्या श्रीनगरमधील कमाल तापमान 19 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 7 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. वारे ताशी 55 ते 60 किलोमीटर वेगाने वाहतील. कोलकात्यातील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील.

पंजाब राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पंजाबमधील अनेक जिल्ह्यांतील वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 45 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. राजस्थान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा आणि वादळाचा इशारा जारी करण्यात आला आहे. या काळात वारे ताशी 20 ते 30 किलोमीटर वेगाने वाहतील. मध्य प्रदेश राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >