
विरार: अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकाराला कंटाळून विरारमधील एका 35 वर्षीय ज्युनिअर आर्टिस्टने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नलिनी नामजोशी असे मृत महिलेचे नाव असून, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तिने एका तरुणाकडून होत असलेल्या ब्लॅकमेलिंगचा उल्लेख केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलिसांनी आरोपीविरोधात खंडणी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे.
मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपास केल्यानंतर मृत ...
नलिनी ही विरार पश्चिमेतील जे.पी. नगर येथे आई आणि भावासोबत राहत होती. ती चित्रपटांमध्ये ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करत होती. गुरुवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडली होती. मात्र, सकाळी 6.15 च्या सुमारास विरार पश्चिमेकडील ओलांडा नाका परिसरातील रस्त्यावर तिचा मृतदेह आढळून आला. तिने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. घटनास्थळी पोलिसांना तिची आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही मिळाली. त्यात एका तरुणाच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे तिने नमूद केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले आहेत. अमरावतीतील भाजपच्या बंडखोरीचे ...
कामाचे आमिष दाखवून अश्लील व्हिडिओ काढल्याचा आरोप
अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, नलिनीची योगेश म्हापणकर ऊर्फ सौरभ पत्की (वय 27) याच्याशी ओळख झाली होती. वेब सीरीज, टेलिव्हिजन सीरियल आणि जाहिरातींमध्ये काम मिळवून देण्याचे आश्वासन त्याने नलिनीला दिले होते. या आमिषातून त्याने तिला भाईंदर येथील एका फ्लॅटवर नेऊन तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढल्याचा आरोप आहे.त्यानंतर हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने नलिनीकडून तब्बल एक कोटी रुपये उकळल्याचे पोलिसांनी सांगितले. ही रक्कम देण्यासाठी नलिनीने घरातील दागिने विकले, बँकेतील बचत खर्च केली, तसेच अन्य वस्तूंचीही विक्री केली. मात्र, एवढी मोठी रक्कम दिल्यानंतरही आरोपीकडून आणखी पैशांची मागणी सुरूच होती, असा आरोप आहे.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु लागली आहे. यापूर्वी नगरसेवकांनी केलेली ...
सर्वस्व गमावल्यानंतरही पैशांचा तगादा
ब्लॅकमेलिंगमुळे नलिनी आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरी जात असल्याचे तिच्या चिठ्ठीतील मजकुरावरून स्पष्ट होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. घरातील दागिने, आयुष्यभराची बचत आणि मौल्यवान वस्तू विकूनही पैशांचा तगादा थांबत नसल्याने ती हतबल झाली होती. अखेर या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे मनोरंजन क्षेत्रात काम मिळवून देण्याच्या आमिषातून महिलांना जाळ्यात ओढून त्यांचे शोषण आणि ब्लॅकमेलिंग केले जात असल्याच्या गंभीर प्रश्नाला पुन्हा एकदा वाचा फुटली आहे.



