
मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून त्यातील तत्वे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे महत्चसचे आहे. समता, न्याय आणि समान संधी या मूल्यांच्या आधारे विविध भाषा, जाती, धर्म आणि संस्कृती असलेल्या देशाला एकत्र ठेवण्याचे काम संविधान करते. त्यामुळे संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. शिक्षणातून समाजाला समर्पित आणि मूल्यनिष्ठ नागरिक घडले, तरच देशाच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने गती मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी नागरिकशास्त्र आणि संवैधानिक मूल्यांवर आधारित 'स्मार्ट नागरिक' आणि 'विद्यार्थी प्रेरणा' या दोन पुस्तकांचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते भवानी शंकर मार्ग मुंबई पब्लिक स्कूल, दादर (पश्चिम) येथे गुरुवारी पार पडला. याप्रसंगी मुख्यमंत्री आणि माजी सरन्यायाधीश यांनी इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांच्या वर्गात जावून या पुस्तिकेतील धडे समजावून सांगितले. तसेच विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.
मुंबई: बदलती जीवनशैली, मोबाईलचा वाढता वापर, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि मानसिक ताण या वेगवेगळ्या कारणांमुळे तरूण- तरूणींमध्ये ...
मुंबई पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांचे कौतुक
मुंबई पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या आकलनशक्तीचे आणि जिज्ञासेचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. शाळेतील संगणक प्रयोगशाळेत सुरू असलेले आधुनिक स्वरूपाचे काम पाहून समाधान वाटल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांचे कौतुक करत त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन केले.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,विविधतेने नटलेल्या देशात एकता टिकविणे आणि प्रत्येकाला समान संधी उपलब्ध करून देणे, हे संविधानाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. संविधानातील अधिकार आणि कर्तव्ये समजून घेतल्यास तत्त्वनिष्ठ आणि मूल्यनिष्ठ समाज घडविता येईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एका 12 वर्षीय मुलीने ...
राज्यघटनेतील मूल्ये बालवयातच रुजवावीत : माजी सरन्यायाधीश गवई
माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना भारतीय राज्यघटनेमुळे देशाची एकता आणि अखंडता टिकून राहण्यास मदत झाल्याचे नमूद केले. गवई म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य तसेच राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये विद्यार्थ्यांच्या मनावर लहान वयातच बिंबवणे आवश्यक आहे. स्वतःच्या हक्कांबरोबरच इतरांच्या स्वातंत्र्याचा आणि अधिकारांचाही आदर केला पाहिजे. सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण, पर्यावरणाची काळजी आणि नागरिक म्हणून कर्तव्यांचे पालन करणे महत्वाचे आहे. आर्थिक परिस्थितीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांना संधींपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी महापालिकेने 50 गुणवंत विद्यार्थ्यांना सिंगापूर येथे विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (एसटीईएम) विषयांच्या अभ्यासदौऱ्यावर पाठवण्याच्या नियोजनाचे त्यांनी कौतुक केले.
मुंबई : देशातील लोकशाही व्यवस्था मजबूत राखणे, भारतीय संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्याच्या उदात्त उद्देशाने ...
शिक्षण म्हणजे केवळ परीक्षा उत्तीर्ण होणे नव्हेतर...
शिक्षण म्हणजे केवळ परीक्षा उत्तीर्ण होणे किंवा पदवी मिळवणे नसून, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची आणि जबाबदारीने जगण्याची ताकद मिळवणे होय. विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन, पाणी व वीज बचत, सामाजिक समानता आणि सार्वजनिक संसाधनांचा जबाबदारीने वापर यांचे शिक्षण दिले जाणार आहे. ‘विद्यार्थी प्रेरणा’ पुस्तकावर आधारित मराठी भाषेतील परीक्षा जानेवारी 2027 मध्ये घेण्याचा मानस असून, विजेत्या विद्यार्थ्यांचा 14 एप्रिल 2027 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गौरव करण्यात येणार असल्याचेही महापौरांनी सांगितले.
'स्मार्ट नागरिक' हे पुस्तक नागरिकशास्त्र आणि संवैधानिक मूल्यांवर आधारित असून 'विद्यार्थी प्रेरणा' हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या दोन्हीही पुस्तके विद्यार्थ्यांना विचार करण्यास, योग्य निर्णय घेण्यास तसेच आपले कुटुंब, शाळा, समाज व देशाप्रती आपली असलेली जबाबदारी समजून घेण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहेत.
या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर रितू तावडे, उप महापौर संजय घाडी, आमदार अमीत साटम, आमदार महेश सावंत, आमदार कालिदास कोळंबकर, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, गटनेते अमेय घोले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते तथा जी उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक यशवंत किल्लेदार, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदीर्गे, तसेच नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह उप आयुक्त (परिमंडळ 2) प्रशांत सपकाळे, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, सहायक आयुक्त योगेश देसाई आदी उपस्थित होते.



