
मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एका 12 वर्षीय मुलीने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून दीड महिन्याच्या मुलीला खाली फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमध्ये त्या दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
दरम्यान, ही धक्कादायक घटना काल रात्री (15 ऑक्टोबर- गुरूवार) गरेगाव पूर्वेतील शिवशाही प्रोजेक्टच्या इमारत क्रमांक 1 मध्ये घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीड वर्षांच्या चिमुकलीला इमारतीच्या सहाव्या मजल्यावर खेळत असताना, एका १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने त्या चिमुकलीला कथितरित्या उचलून थेट डक्टमध्ये ढकलून दिले. या घटनेमुळे दिंडोशी परिसर हादरले आहे.
विरार: अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकाराला कंटाळून विरारमधील एका 35 वर्षीय ज्युनिअर ...
इमारतीतील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपूर्वीच शिवशाही प्रोजेक्टच्या इमारत क्रमांक 1 मध्ये शेख कुटुंबिय राहायला आले होते. त्यानंतरच ही हृदयद्रावक घटना घडली आहे. दीड वर्षीय चिमुरडी सहाव्या मजल्याच्या गॅलरीमध्ये खेळत होती. खेळत असतानाच थेट 12 वर्षीय अल्पवयीन मुलीने त्या चिमुरडीला ढकलून दिले. त्यामध्ये ह्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. गुरूवारी (15 ऑक्टोबर) रात्री 10.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. दरम्यान, 12 वर्षीय मुलीच्या आईने तात्काळ सोसायटीतील केबिनमध्ये जाऊन सोसायटीचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज डिलिट करून पुरावा मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सायबर एक्सपर्टकडून फुटेज रिकव्हरी केल्याने या घटनेचा पर्दाफाश झाल्याची माहिती समोर आली.
मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपास केल्यानंतर मृत ...
दिंडोशी पोलीस स्थानकात ह्या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिंडोशी पोलिसांनी 12 वर्षीय मुलगी आणि तिची आई या दोघींचीही पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या दोघींसह शेख कुटुंबीय आणि इमारतीतील इतरत्र रहिवाशांचीही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. दिंडोशी पोलीस या प्रकरणाच्या प्रत्येक पैलूचा बारकाईने तपास करत आहेत. घटनेमुळे इमारतीतील रहिवाशांमध्ये भीती आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या तपासामुळे आता दीड वर्षाच्या चिमुकलीच्या मृत्यू मागील आणि या घटनेमागील संपूर्ण सत्य समोर येईल. दरम्यान, या प्रकरणात लवकरच नवीन खुलासे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




