"अखेर मनातलं ओठांवर आलंच, हा सगळा खेळ..."; प्रशांत भूषण यांचा व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल

सीजेपी आणि विरोधी पक्षांकडून दिल्लीत सुरू असलेले आंदोलन म्हणजे सत्तेसाठी सुरू असलेला खेळ आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केला.

मुंबई: सीजेपी आणि विरोधी पक्षांकडून दिल्लीत सुरू असलेले आंदोलन म्हणजे सत्तेसाठी सुरू असलेला खेळ आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केला. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर करत, विद्यार्थ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा आधार घेणे, जाती-धर्माच्या तसेच भाषेच्या नावाखाली समाजात द्वेष पसरवणे आणि घटनात्मक संस्थांची प्रतिमा मलीन करणे, हे सर्व सत्तेसाठी सुरू असल्याची टीका त्यांनी केली.



फडणवीस म्हणाले, "अखेर मनात लपलेली गोष्ट ओठांवर आलीच. देशात अस्थिरता निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. सर्व खेळ सत्तेची खुर्ची मिळवण्याचा आहे. मग, त्यासाठी विद्यार्थी, शेतकऱ्यांना चिथावणी द्यावी लागली तरी चालेल. जाती, भाषेच्या नावावर द्वेष परसवावा लागला तरी चालेल. देशाच्या प्रतिष्ठित संस्थांची प्रतिमा मलीन केली जात आहे. आंदोलनाच्या आडून अराजकता पसरवण्याचा यांचा उद्देश आहे", असेही त्यांनी सांगितले.





दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही दिल्लीतील अलीकडील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांवर टीका केली आहे. विरोधक तरुणांची दिशाभूल करत असून, लोकशाहीतील घटनात्मक संस्थांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. बांगलादेशातील घडामोडींच्या धर्तीवर भारतातही सरकार बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सिंह यांनी केला.


Comments
Add Comment

Skin Treatment : सणासुदीच्या काळात त्वचेला ग्लो देण्यासाठी 5 खास स्किन ट्रीटमेंट्स; जाणून घ्या कधी कराव्यात?

दिवाळीत त्वचेवर नैसर्गिक चमक आणि ग्लो मिळवण्यासाठी सणांच्या काही दिवस आधी योग्य स्किन ट्रीटमेंट्स घेणे

जनाब संजय राऊत माफीवीर! भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा हल्लाबोल; महाराष्ट्रासह देशातील जनतेचीही माफी मागण्याची मागणी

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाची माफी मागण्याच्या मुद्द्यावरून भाजपने उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका

Rajgira Kheer : नवरात्रीच्या उपवासात थकवा जाणवतोय ? दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी ट्राय करा ही चवदार राजगिरा खीर.

  [caption id="attachment_1066892" align="aligncenter" width="850"] राजगिरा, दूध, बदाम आणि ड्रायफ्रूट्सचा हा परफेक्ट संगम तुमच्या उपवासाचा उत्साह

Bengaluru Metro : मेट्रो ठरली जीवनदायिनी! बंगळुरूमध्ये 18 मिनिटांत मानवी हृदयाची यशस्वी वाहतूक, Video Viral

बंगळूर :  बंगळूर शहरातील वाहतूक कोंडीमुळे अनेकदा रुग्णालयात पोहोचण्यास विलंब होतो. मात्र, बंगळूरच्या नम्मा

IND vs WI: वेस्ट इंडिजसमोर भारताचा 'अभेद्य किल्ला'! 7 वर्षांचे वर्चस्व राखण्याचे टीम इंडियासमोर आव्हान

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा निर्णय शेवटच्या सामन्यावर येऊन ठेपला आहे. 17

Yo Yo Honey Singh : 'यो यो हनी सिंग'च्या अडचणीत मोठी वाढ! आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलचा मोठा दणका

प्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार हिरदेश सिंग, ज्यांना जगभर 'यो यो हनी सिंग' (Yo Yo Honey Singh) या नावाने ओळखले जाते, त्यांच्यामागील