Nitesh Rane: 'जिहादी मानसिकतेला बळ देऊ नका’ युनूस शेख प्रकरणी मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया

पक्षातून बाहेर काढण्याची उपमुख्यमंत्री शिंदेंकडे व्यक्त केली अपेक्षा

मुंबई : ‘हिंदू राष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या आणि जिहादी मानसिकता बाळगणाऱ्यांना बळ देऊ नये,’ अशी प्रतिक्रिया राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी युनूस शेख प्रकरणात दिली. युनूस शेख यांना शिवसेनेशी संबंधित केबल सेनेचे अध्यक्षपद दिल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाचा विचार करून संबंधितांना पक्षातून बाहेर काढावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.(NITESH RANE)



“सापाला आपण दूध पाजत नाही. उद्या ते कुठेही असले, तरी त्यांच्या डोक्यातून जिहाद जाणार नाही. आपल्या स्वतःच्या मुलीला त्यांनी काय शिकवण दिली, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे,” असे राणे म्हणाले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे या बाबींचा गांभीर्याने विचार करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३० मधून एमआयएमच्या नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांना शिवसेनेशी संबंधित केबल सेनेचे अध्यक्षपद देण्यात आल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर हे प्रकरण ऐरणीवर आले. महापालिका निवडणुकीतील विजयानंतर सहर शेख हिचे भाषण समाजमाध्यमांवर प्रसारित झाले होते. ‘कैसा हराया’ असे म्हणत तिने विरोधकांना डिवचले होते. त्याच भाषणात संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने व्यापून टाकण्याचे वक्तव्य केल्याचा आरोपही झाला होता. या वक्तव्यावरून महायुतीतील नेत्यांसह शिंदे यांच्या शिवसेनेतूनही टीका झाली होती.



अशा पार्श्वभूमीवर युनूस शेख यांना केबल सेनेचे अध्यक्षपद मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. मात्र, शिवसेनेत प्रवेश केल्याचे वृत्त युनूस शेख यांनी फेटाळले आहे. आपण अनेक वर्षांपासून केबल आणि इंटरनेट सेवेशी संबंधित असून, त्याच क्षेत्रातील पद आपल्याला देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. आपल्याबाबत विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांमध्ये तथ्य नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, युनूस शेख यांना देण्यात आलेल्या नियुक्तिपत्रात ‘एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने’ असा उल्लेख असल्याने त्यांच्या दाव्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.




Comments
Add Comment

सचिन सानप शिवसेनेचा उमेदवार नाही! उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

मुंबई : पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत समन्वयाचा अभाव दिसत असताना, उद्योगमंत्री उदय सामंत

‘शिळ्या कढीला ऊत आणू नका!’ आमदार विक्रम पाचपुतेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा...

पुणे : “सुषमाताई अंधारे यांनी मला अभ्यासू आमदार असल्याचे मान्य केले, त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो.

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला शिवसेना, राष्ट्रवादी निवडून आणणार - मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा

पुणे : पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आणि शिवसेनेचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार सचिन सानप

भाजपच्या 100 नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस; पक्षाचा मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पक्षाच्या

Navnath Ban : बांगलादेशी घुसखोरांची नावे मतदार यादीत कायम ठेवण्यासाठी एसआयआरला विरोध; नवनाथ बन यांचा आरोप

मुंबई: मतदार यादीतील पात्र मतदारांची नोंदणी योग्य पद्धतीने व्हावी आणि अपात्र नावे वगळली जावीत, यासाठी निवडणूक

बारामतीच्या सहकारात पुन्हा पवार कुटुंबाची चर्चा; सोमेश्वर कारखान्याच्या निकालानंतर सुनील तटकरे काय म्हणाले?

मुंबई : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या निवडणुकीत अखेर 'फोटोफिनिश' यश