
मुंबई: “विरोधक सुप्रीम कोर्टावर मोर्चे काढतात, चाल करुन जातात, पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन करतात, दिल्लीत आंदोलन करतात. या आंदोलकांमागे परकीय शक्तींचा हात किंवा सहभाग दिसतो. विरोधकांना देशात अशांतता आणि अराजकता पसरवायची आहे. ते नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंकेचे उदाहरण देतात हे कशाचे द्योतक आहे?”, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केला.
मुंबई : “उमर खालिदच्या समर्थनार्थ उभे राहणारे लोक आधी पाकिस्तानचे झेंडे फडकवत होते, ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणांसह जिहादला मदत करत होते. मात्र आता ...
ठाण्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी दिल्लीतील विरोधकांच्या आंदोलनाचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. शिंदे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानिक संस्थांचा अपमान करण्याचे काम विरोधी पक्ष नेते राहुल गांधी करत आहेत. हातात संविधानाचे पुस्तक घेऊन ते संविधानविरोधी काम करत आहेत. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयावर या व्यवस्थांवर ते सवाल उपस्थित करत आहेत. फेक नरेटिव्हच्या माध्यमातून लोकांना भडकवण्याचे काम करत आहेत. मात्र देशातील १४० कोटी जनता विरोधकांच्या फेक नरेटिव्हला फसणार नाहीत. काम करणाऱ्यांच्या पाठीशी जनता उभी राहिल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. परकीय शक्तींच्या मदतीने देशात अराजकता पसरवण्याचे विरोधकांचे मनसुबे येथील जनता पूर्ण होऊ देणार नाही. राहुल गांधी यांनी देश तोडण्याची भाषा करणे हे दुर्देवी आहे. त्यांनी देश जोडण्याची भाषा करावी. सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचे काम राहुल गांधी आणि इंडि आघाडीने केले त्याला कोर्टाने फटकारले, असे ते म्हणाले.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाची माफी मागण्याच्या मुद्द्यावरून भाजपने उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांच्यानंतर आता ...
दरम्यान, उबाठा गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. ठाण्यात पार पडलेल्या या पक्ष सोहळ्यावेळी शिवसेना सोशल मीडिया राज्यप्रमुख तथा युवासेना सरचिटणीस राहुल कनाल आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्यांचे पक्षात स्वागत करताना शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे म्हणाले की गेली अनेक वर्ष दुबे यांना शिवसेनेते काम करताना पाहिले आहे. राष्ट्रीय पातळीवर पक्षाची भूमिका मांडणाऱ्या या कार्यकर्त्याने आज मूळ शिवसेनेत प्रवेश केला. आनंद दुबे यांच्यासह गुलाबचंद मौर्य, सुनील चौबे, ब्रीजेश मोर्य, दशरत प्रजापती, प्रवीण दुबे, धनंजय गुप्ता यांच्यासह अनेकांनी आज शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. दुबे यांना शिवसेनेच्या कार्यपद्धती माहित आहे. राहुल कनाल दुबे यांच्या कायम संपर्कात होते. दुबे यांनी योग्य पक्षात प्रवेश केला आहे. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे इथं कोणी मालक नाही सगळे कार्यकर्ते म्हणून काम करतो, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. दुबे यांनी राष्ट्र प्रथमची भूमिका घेतली. हीच भूमिका बाळासाहेबांची होती आणि आज मोदीजींची सुद्धा आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. राष्ट्रीय स्तरावर शिवसेना विविध राज्यांमध्ये काम करत आहे. उत्तर प्रदेशात शिवसेनेच्या विस्तारासाठी आनंद दुबे आणि त्यांची टीम काम करेल, असे ते म्हणाले.
मुंबई: सीजेपी आणि विरोधी पक्षांकडून दिल्लीत सुरू असलेले आंदोलन म्हणजे सत्तेसाठी सुरू असलेला खेळ आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...
पुण्यात अपक्ष सचिन सानप यांना पाठिंबा
विधान परिषद निवडणुकीबाबत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सचिन सानप हा मूळचा शिवसेनेचा आहे. पुणे शिक्षक मतदार संघात सचिन सानप याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. तिथे महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होईल. इतर चारही ठिकाणी महायुती म्हणूनच निवडणूक लढवतोय आणि काम करतोय. विधान परिषद निवडणुकीत पाचही ठिकाणी महायुतीचेच उमेदवार विजयी होतील, असाही दावा त्यांनी केला.






