Rajya Natya Spardha : राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांना २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

१६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धांमधील नाटकांचे परीक्षण करण्यासाठी नाट्य क्षेत्रातील अनुभवी कलाकारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांना यंदा दि. १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धांमधील नाटकांचे परीक्षण करण्यासाठी नाट्य क्षेत्रातील अनुभवी कलाकारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत हौशी मराठी नाट्य स्पर्धा, हौशी हिंदी नाट्य स्पर्धा, संस्कृत नाट्य स्पर्धा, संगीत नाट्य स्पर्धा, मराठी बालनाट्य स्पर्धा, दिव्यांग बालनाट्य स्पर्धा, मराठी एकांकिका स्पर्धा तसेच मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा आदी विविध राज्यस्तरीय नाट्य स्पर्धांचे दरवर्षी आयोजन करण्यात येते.



राज्य नाट्य स्पर्धांच्या परीक्षण प्रक्रियेत नाट्य क्षेत्रातील अनुभवी कलाकारांचा अधिकाधिक सहभाग व्हावा आणि त्यांच्या अनुभवाचा लाभ स्पर्धेतील कलाकार व नाट्यसंस्थांना मिळावा, या उद्देशाने यंदा परीक्षणासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार (Dr. Ashish Shelar) यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.


यंदाच्या राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांचे परीक्षण करण्यासाठी नाट्य क्षेत्रातील कलाकारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. इच्छुक कलाकारांना दि. २५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. ऑनलाइन अर्ज तसेच यासंदर्भातील अधिक माहितीसाठी mahanatyaspardha.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. पात्र व अनुभवी नाट्य कलाकारांनी या संधीचा लाभ घेऊन विहित मुदतीत अर्ज सादर करावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Ranbali Movie Review : कागदावर धमाकेदार, पण पडद्यावर फिका? 'रणबाली' चित्रपट कसा आहे ?

साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाच्या (Vijay Devarkonda) बाबतीत एकच गोष्ट वारंवार घडताना दिसते. त्याच्या एखाद्या

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या