Friday, October 16, 2026

IND vs WI: वेस्ट इंडिजसमोर भारताचा 'अभेद्य किल्ला'! 7 वर्षांचे वर्चस्व राखण्याचे टीम इंडियासमोर आव्हान

IND vs WI 5th T20I: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी20 मालिकेतील शेवटचा सामना होत आहे. हा सामना निर्णायक असल्याने क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत. कारण या सामन्यावर मालिकेचा निकाल लागणार आहे. हा सामना वेस्ट इंडिजने जिंकला तर इतिहास रचणार आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा निर्णय शेवटच्या सामन्यावर येऊन ठेपला आहे. 17 ऑक्टोबरला बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये शेवटचा सामना खेळला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. कारण चार सामन्यानंतर मालिकेत 2-2 अशी स्थिती आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे. कारण वेस्ट इंडिजने भारताला दोन सामन्यात वाईट पद्धतीने नमवलं आहे. त्यामुळे पाचव्या टी20 सामन्यात काय होईल? सांगता येत नाही. दुसरीकडे, गेल्या सात वर्षांपासून टी20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा वरचष्मा आहे. टी20 क्रिकेटमध्ये भारतीय भूमीत टीम इंडियाचा अभेद्य किल्ला आहे. भारताने घरच्या मैदानावर शेवटचा टी20 सामना 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध गमावला होता. एरॉन फिंचच्या नेतृत्वात भारताला दोन सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0 ने क्लिन स्वीप मिळाला होता. त्यानंतर टीम इंडियाने भारतात खेळलेली एकही टी20 मालिका गमावली नाही.

वेस्ट इंडिजकडे इतिहास रचण्याची संधी

वेस्ट इंडिजकडे भारताचा सात वर्षांपासून सुरू असलेला विजयरथ रोखण्याची संधी आहे. कारण वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना आपला इंगा दाखवला आहे. त्यामुळे सामना पालटण्याची ताकद आहे. वेस्ट इंडिजकडे सलग दुसऱ्यांदा भारताला टी20 मालिकेत पराभूत करण्याची संधी आहे. दोन्ही संघ 2023 मध्ये कॅरेबियन बेटावर भिडले होते. तेव्हा वेस्ट इंडिजने भारताला 3-2 ने पराभूत केलं होतं. आता वेस्ट इंडिजकडे भारताचा 7 वर्षांची विजयी घोडदौड रोखण्याची संधी आहे.

चिन्नास्वामी स्टेडियममध्ये भारताची अग्निपरीक्षा

वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेल्या चार टी20 सामन्यात भारताची कमकुवत बाजू उघड झाली आहे. कारण नाणेफेकीचा कौल जिंकूनही वेस्ट इंडिज संघाने चौथ्या सामन्यात आपला वरचष्मा दाखवला आहे. वेस्ट इंडिजने या सामन्यात 247 धावा ठोकल्या होत्या आणि विजयासाठछी 247 धावा दिल्या होत्या. मात्र या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 223 धावांवर सर्वबाद झाला. यासह भारताने हा सामना 24 धावांनी गमावला. वेस्ट इंडिजच्या वाटेला प्रथम फलंदाजी आल्यानंतर त्यांनी पॉवर हिटिंगने भारतीय गोलंदाजांवर प्रहार केला. आता बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये तशीच स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. कारण या स्टेडियमची बाउंड्री छोटी आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या पॉवर हिटिंगचा सामना भारतीय गोलंदाजांना कठीण जाऊ शकते.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >