INDW vs ZIMW: नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने, कर्णधार स्मृती मंधानाने गोलंदाजी निवडत म्हणाली..

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला. कर्णधार स्मृती मंधानाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात पहिला टी20 सामना होत आहे. कर्णधार स्मृती मंधानाने पूर्णवेळ कर्णधारपदाची धुरा हाती घेतल्यानंतर हा पहिलाच सामना आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. पहिला सामना आणि स्मृती मंधानाला नशिबाची साथ मिळाली. नाणेफेकीचा कौल हा टीम इंडियाच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कर्णधार स्मृती मंधाना म्हणाली की, 'आज आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करण्यास प्राधान्य देऊ. आमची अशी दृष्टी आहे की, भविष्यात बरेच सामने रात्री आणि दवात खेळले जातील. आमचा संघ निवडताना आम्ही निश्चितपणे याचा विचार केला आहे. म्हणूनच आज आम्ही तीन वेगवान गोलंदाज, दोन मुख्य फिरकी गोलंदाज आणि सहावा पर्याय म्हणून शफालीला संधी देत ​​आहोत.'



काय म्हणाली स्मृती मंधाना?


प्लेइंग 11 मधून कोण आत आणि कोण बाहेर? कर्णधार स्मृती मंधाना म्हणाली की, दुर्दैवाने, प्रेमा रावत, जिंतिमणी , मिन्नू मणी आणि कम्मू संघातून बाहेर आहेत. अर्थात, त्या सर्व चांगल्या खेळाडू आहेत, पण आजच्या आमच्या संघरचनेनुसार, दुर्दैवाने त्या बाहेर आहेत.' कर्णधार म्हणून तुमची तयारी किती आहे आणि भारताची तयारी कशी झाली आहे? या प्रश्नावर स्मृती मंधाना म्हणाली की,'मी भारतासाठी काही वेळा आणि डब्ल्यूपीएलमध्येही नेतृत्व केले आहे. त्यामुळे मी असे म्हणणार नाही की मी याचा खूप जास्त विचार करत आहे. मला फक्त तसxच क्रिकेट खेळायचं आहे. आणि भारतीय संघाबद्दल बोलायचं झालं तर, मला वाटतं की हा एक खूपच तरुण संघ आहे. अर्थात, झिम्बाब्वे एक उत्तम संघ आहे, आणि आम्ही लक्ष ठेवून असू.'





" target="_blank" rel="noopener">स्मृती मंधाना नवोदीत खेळाडूंबाबत म्हणाली की. 'निकी आज पदार्पण करत आहे आणि अनुष्का येत आहे, त्यामुळे आमच्या संघात बरेच तरुण खेळाडू आहेत आणि आम्ही अनेक गोष्टींवर मेहनत घेतली आहे. त्यामुळे आशा आहे की चॅम्पियनशिप ट्रॉफीपर्यंतच्या पुढील तीन महिन्यांत आम्ही त्या सर्व गोष्टी साध्य करू शकू.'



दोन्ही संघांची प्लेइंग 11


झिम्बाब्वे महिला (प्लेइंग इलेव्हन): न्याशा ग्वांझुरा, चिपो मुगेरी-तिरिपानो, केलिस एनधलोवू, प्रिय बिझा, जोसेफिन एनकोमो (कर्णधार), मॉडेस्टर मुपाचिकवा (विकेटकीपर), मिशेल मावुंगा, फ्रान्सिस्का चिपारे, ऑलिंदर चारे, तेंडाई मकुशा, शार्न मेयर्स.


भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, स्मृती मानधना (कर्णधार), अनुष्का शर्मा, हरमनप्रीत कौर, निकी प्रसाद, ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, श्री चरणी, अरुंधती रेड्डी, नंदनी शर्मा, क्रांती गौड

Tags
स्मृती मंधानाsmriti mandhanaभारतीय महिला क्रिकेट संघभारत झिम्बाब्वे सामना
Comments
Add Comment

Jai Meena Asian Games : "पंतप्रधानांनी पाठ थोपटत म्हटलं, 'धन्यवाद आपका'..."; आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचणाऱ्या जय मीनाच्या खास आठवणी!

जपानमधील आयची-नागोया येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये (Aichi-Nagoya Asian Games 2026) भारताचा प्रतिभावान खेळाडू

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यापूर्वी टीम इंडियाने हुकमी एक्का काढला, झालं असं की..

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटच्या सामन्यापूर्वी टीम इंडियात एक बदल करण्यात

IND vs WI: वेस्ट इंडिजसमोर भारताचा 'अभेद्य किल्ला'! 7 वर्षांचे वर्चस्व राखण्याचे टीम इंडियासमोर आव्हान

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा निर्णय शेवटच्या सामन्यावर येऊन ठेपला आहे. 17

पुरूष क्रिकेटपटूंनाही जे जमलं नाही, ते स्मृती मंधाना करणार! फक्त 133 धावा करताच रचणार ऐतिहासिक महाविक्रम

[caption id="attachment_1066855" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धकांवर उधळली स्तुतीसुमनं! बेबी बॉस वैभव सूर्यवंशीची अशी होती रिॲक्शन Video

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 85 पदकं मिळवून चौथं

IND vs WI 5th T20I: बंगळुरूत तीन बदल केले तरच टीम इंडियाचं विजयाचं गणित सुटणार! समजून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज टी20 मालिका आता रंगतदार वळणावर आहे. कारण वेस्ट इंडिजने भारतीय संघाला या मालिकेत तोडीस तोड