वैद्यकीय तज्ज्ञांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिले आरोग्याचे धडे, ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमाला तरूण- तरूणींचा उत्सफुर्त प्रतिसाद

बदलत्या जीवनशैलीमुळे सध्याच्या तरूण- तरूणींना आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागले आहेत. याच समस्या लक्षात घेऊन वैद्यकीय तज्ज्ञांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आरोग्याचे धडे दिले आहेत.

मुंबई: बदलती जीवनशैली, मोबाईलचा वाढता वापर, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि मानसिक ताण या वेगवेगळ्या कारणांमुळे तरूण- तरूणींमध्ये आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागल्या आहेत. या कारणांमुळे तरुण- तरुणींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. काळाची गरज समोर ठेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळावे, याकरिता नवरात्रोत्सवाच्या दिवसांत कॉलेजमध्ये जाऊन तरूण- तरूणींसाठी सरकारकडून ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद, जागर आरोग्याचा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत राज्यात आतापर्यंत 393 सत्रे झाली असून, 52 हजार 386 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.



तरुण वयातच विद्यार्थ्यांना आरोग्याची काळजी घेण्याच्या योग्य सवयी लागाव्यात, या उद्देशाने मुख्यमंत्र्यांकडून महाविद्यालयामध्ये हा महत्त्वाचा उपक्रम राबवला जात आहे. विद्यार्थ्यांना आहार, व्यायाम, मानसिक आरोग्य आणि निरोगी जीवनशैली यांचे महत्त्व समजावे, शिवाय आरोग्यविषयक प्रश्नांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळावे, यासाठी ही सत्रे आयोजित केली जात आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यापीठ आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक आणि वैद्यकीय तज्ज्ञ विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करत आहेत. या सत्रांमध्ये वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखांतील विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग नोंदवला होता.


विभागनिहाय आकडेवारीनुसार, पश्चिम महाराष्ट्रात 122 सत्रे झाली असून, त्यात 11 हजार 980 विद्यार्थी सहभागी झाले. मराठवाड्यात 91 सत्रांत 9 हजार 854, नाशिक विभागात 93 सत्रांत 10 हजार 634, तर अमरावती विभागात 62 सत्रांत 6 हजार 352 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कोकण विभागात 53 सत्रांत 6 हजार 404 विद्यार्थी सहभागी झाले. मुंबई विभागात 24 सत्रे होऊन 3 हजार 269 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. नागपूर विभागात 45 सत्रे झाली असून, त्यात 3 हजार 893 विद्यार्थी सहभागी झाले.



‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमामध्ये घेतलेल्या सत्रांमध्ये संतुलित आहार, नियमित व्यायाम, मानसिक आरोग्य, मोबाइल- सोशल मीडियाचा वापर, व्यसनमुक्ती आणि निरोगी जीवनशैली याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. आरोग्याची काळजी कशी घ्यावी आणि दैनंदिन जीवनात कोणते बदल करावेत, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक होऊन ही माहिती कुटुंबीय आणि मित्रांपर्यंतही पोहोचवावी, हा देखील या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा उपक्रम तरुणांना आरोग्याबाबत जागरूक करण्यासाठी महत्त्वाचा आहे. महाविद्यालयीन जीवनातच आहार, व्यायाम, मानसिक आरोग्य आणि निरोगी जीवनशैली यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. तज्ज्ञांशी थेट संवाद साधल्यामुळे विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक प्रश्न विचारता येतात आणि योग्य मार्गदर्शन मिळते. या माध्यमातून आरोग्याबाबत जागरूक पिढी घडण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुखांनी दिली.

Comments
Add Comment

मुंबईत दीड वर्षांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं पुरावे नष्ट करण्यासाठी वापरली शक्कल

मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील

abvp protest mumbai university : ‘बांगलादेशसारख्या अराजकतेला भारतात थारा नको!’; संविधानाच्या रक्षणासाठी मुंबई विद्यापीठात अभाविपतर्फे भव्य स्वाक्षरी अभियान व निदर्शने

मुंबई : देशातील लोकशाही व्यवस्था मजबूत राखणे, भारतीय संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता

Virar News: विरारमध्ये ज्युनिअर आर्टिस्टची आत्महत्या, अश्लील व्हिडिओंच्या आधारे कोट्यवधींची खंडणी उकळल्याचा आरोप

विरार: अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकाराला कंटाळून

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु