Nashik : नाशिक जिल्ह्यात 17 आणि 18 ऑक्टोबरला मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे, 26 ऑक्टोबरपर्यंत अर्जाची संधी

Nashik : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत नाव नोंदविणे, मतदारांच्या तपशिलात दुरुस्ती करणे किंवा नाव वगळण्यासंदर्भात हरकत नोंदविण्यासाठी २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.



सर्व मतदान केंद्रांवर बीएलओ राहणार उपस्थित


या विशेष शिबिरांमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) उपस्थित राहणार आहेत. या कालावधीत नागरिकांना मतदार नोंदणी, मतदार यादीतील तपशिलात दुरुस्ती आणि नाव वगळण्यासंदर्भातील अर्ज सादर करता येतील. नवीन मतदारांना नाव नोंदविण्याची संधी मिळावी आणि प्रारूप मतदार यादीतील त्रुटी दूर व्हाव्यात, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी संबंधित मतदान केंद्रावर जाऊन मतदार यादीतील आपले नाव तपासावे आणि आवश्यक असल्यास अर्ज सादर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



कोणत्या कामासाठी कोणता अर्ज भराल ?


मतदार यादीसंदर्भातील विविध कामांसाठी निवडणूक आयोगाने वेगवेगळे अर्ज निश्चित केले आहेत.


- नमुना ६ (Form-6) : नवीन मतदार म्हणून नाव नोंदविण्यासाठी.


- नमुना ७ (Form-7) : विद्यमान मतदारयादीतील नावाच्या प्रस्तावित समावेशावर किंवा वगळण्यावर हरकत नोंदविण्यासाठी


- नमुना ८ (Form-8)  : निवासाचा पत्ता बदलणे, मतदारयादीतील नोंदी दुरुस्त करणे, मतदार ओळखपत्र (EPIC) बदलून घेणे अथवा दिव्यांग मतदार म्हणून नोंद करण्यासाठी


नमुना ६ सोबत आवश्यक घोषणापत्र सादर करून पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येईल. नोंदीतील दुरुस्तीसाठी नमुना ८ सोबत आवश्यक कागदपत्रे आणि घोषणापत्र जोडणे आवश्यक आहे.



१८ वर्षे पूर्ण झालेल्या युवकांना संधी


१ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे पात्र युवक तसेच प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेले पात्र नागरिक या मोहिमेचा लाभ घेऊ शकतात. पात्र नवमतदारांनी विहित नमुन्यात अर्ज भरून मतदार यादीत आपले नाव नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्जाची सुविधा


मतदार नोंदणीसाठी आवश्यक अर्ज भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत "voters.eci.gov.in" (https://voters.eci.gov.in/) या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. नागरिकांना ऑनलाइन अर्ज करण्याबरोबरच संबंधित मतदार नोंदणी कार्यालयात ऑफलाइन पद्धतीनेही अर्ज सादर करता येतील. आपल्या परिसरातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची माहिती मिळविण्यासाठी किंवा मतदार नोंदणीसंदर्भातील अधिक माहितीसाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथील हेल्पलाइन क्रमांक ०२५३-२३१०५२३ वर संपर्क साधावा.



२६ ऑक्टोबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करा


प्रारूप मतदार यादीतील नावांची पडताळणी करून आवश्यक ते अर्ज विहित मुदतीत सादर करणे महत्त्वाचे आहे. मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी नाव नोंदणी करावी, तर विद्यमान मतदारांनी आपल्या नावासह इतर तपशीलांची खात्री करून घ्यावी. २६ ऑक्टोबर २०२६ ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख असल्याने नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

Comments
Add Comment

75 टक्के स्वदेशी तंत्रज्ञान! INS समर्थक भारतीय नौदलात दाखल, काय आहेत क्षमता?

नवी दिल्ली : भारतीय सागरी सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस

Vasai Open Drain Accident : वसईत उघड्या गटाराने घेतला चिमुरड्याचा बळी

वसई (प्रतिनिधी) : वसई पूर्वेतील वालीव परिसरात घरामागील उघड्या गटारात पडून अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरड्याचा

मुंबईत दीड वर्षांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं पुरावे नष्ट करण्यासाठी वापरली शक्कल

मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील

abvp protest mumbai university : ‘बांगलादेशसारख्या अराजकतेला भारतात थारा नको!’; संविधानाच्या रक्षणासाठी मुंबई विद्यापीठात अभाविपतर्फे भव्य स्वाक्षरी अभियान व निदर्शने

मुंबई : देशातील लोकशाही व्यवस्था मजबूत राखणे, भारतीय संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता

Trump Ukraine : ट्रम्प यांचा युक्रेनला दुहेरी धक्का! रशियाकडून तेल खरेदी अन् स्टारलिंकवर निर्बंध?

वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडवून देत अमेरिकेने युक्रेनला एकाच वेळी दोन मोठे धक्के दिले आहेत.

Crime News : ठाण्यात खतरनाक प्रकार! १७ वर्षीय मित्राची हत्या करून मृतदेह जाळला अन् थेट पोलीस चौकीजवळच पुरला

ठाणे : महाराष्ट्रातील ठाणे (Thane Crime News) शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि अंगावर का आणणारी घटना समोर आली आहे. ठाण्यातील