Friday, October 16, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धकांवर उधळली स्तुतीसुमनं! बेबी बॉस वैभव सूर्यवंशीची अशी होती रिॲक्शन Video

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सन्मान केला गेला. यात महिला आणि पुरूष क्रिकेट संघाचा समावेश होता. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैभव सूर्यवंशी यांचं विशेष कौतुक केलं.

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 85 पदकं मिळवून चौथं स्थान गाठलं. यात 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारतीय स्पर्धकांच्या या कामगिरीचं क्रीडाप्रेमींनी कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमात भारतीय खेळाडूंचं तोंडभरून कौतुक केलं. यावेळी त्यांनी युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याचं नाव न घेता स्तुतीसुमनं उदळली. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमी वयात देशाचं नाव उंचवणाऱ्या खेळाडूंचा खासकरून उल्लेख केला. पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, एशियन गेम्स स्पर्धेत टीम इंडियाने बरेच खेळाडू असे आहेत, ज्यांचं वय 15 ते 17 वर्षे आहे. त्यांनी जबरदस्त कामगिरी करून देशाचा सन्मान वाढवला आहे आणि लोकांची मनं जिंकली आहेत.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'एशियन गेम्स स्पर्धेत भारतीय संघात 15 ते 17 वर्षे वयोगटातील अनेक खेळाडूंचा समावेश होता. या खेळाडूंनी देशवासियांची मने जिंकली आहेत. त्यांनी देशाला सन्मान मिळवून दिला आहे. यावरून हे दिसून येते की, यशाला कोणतीही मर्यादा नसते. लहान वयात सुरुवात केल्याने एक अतिरिक्त फायदा मिळतो.' पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाली की, "लहान वयातच प्रतिभा ओळखणे महत्त्वाचे आहे. आगामी क्रीडा स्पर्धांसाठी आपल्याला आपली तयारी अधिक मजबूत करण्याची गरज आहे. लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 पुढे आहे. भारत 2030 मध्ये कॉमनवेल्थ स्पर्धेचं आयोजन करेल. भारताची 2036 मध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करण्याची आकांक्षा आहे.'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमी वयाच्या खेळाडूंचा उल्लेख केल्यानंतर वैभव सूर्यवंशीच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. त्याचा हसरा चेहरा यावेळी कॅमेऱ्यात चित्रित झाला. कारण एशियन गेम्स 2026 स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या टीम इंडियाचा भाग होता. या स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने आक्रमक सुरूवात करून दिली. या ऐतिहासिक स्पर्धेत वैभवने एकूण 53 धावा करत भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले. श्रीलंकेविरुद्धच्या उपांत्य फेरीत त्याने 21 चेंडूत 38 धावांची आक्रमक खेळी केली, तर पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात दबाव असताना 9 चेंडूत 15 धावा केल्या.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >