Thursday, October 15, 2026

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला संघात टी20 मालिका होणार आहे. भारतीय संघ स्मृती मंधानाने नेतृत्व स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. त्यामुळे या मालिकेकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन सामन्यांची टी20 मालिकेला 16 ऑक्टोबर 2026 पासून सुरूवात होणार आहे. विशेष म्हणजे ही मालिका भारतीय क्रीडाप्रेमींसाठी खास असणार आहे. कारण स्मृती मंधाना पूर्णवेळ कर्णधार म्हणून या मालिकेपासून जबाबदारी स्वीकारणार आहे. खरं तर यापूर्वी तिने 18 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात नेतृत्व केलं आहे. त्यामुळे तिच्याकडे कर्णधारपद भूषवण्याचा अनुभव आहे. तिच्या नेतृत्वात भारताने 11 सामने जिंकले, सहा गमावले आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. दुसरीकडे, या मालिकेसाठी शफाली वर्माकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर माजी कर्णधार हरमनप्रीत कौर या संघात असून एक अनुभवी फलंदाज म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे.

भारत झिम्बाब्वे टी20 मालिकेचं वेळापत्रक

भारत झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. हे तिन्ही सामने रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळले जाणार आहेत. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरूवात होईल. तर 6.30 वाजता नाणेफेकीचा कौल होईल. पहिला टी20 सामना 16 ऑक्टोबरला, दुसरा 18 ऑक्टोबरला, तर तिसरा टी20 सामना 20 ऑक्टोबरला होणार आहे. या मालिकेनंतर भारतीय महिला संघ वडोदऱ्यातील कोटंबी स्टेडियममर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळेल.

भारत महिला विरुद्ध झिम्बाब्वे महिला टी20 सामना कुठे पाहता येईल?

  • टीव्ही चॅनल: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनल्स
  • थेट प्रक्षेपण: जिओहॉटस्टार ॲप आणि वेबसाइट

भारत-झिम्बाब्वे महिला टी20 आंतरराष्ट्रीय संघ

भारतीय महिला संघ: स्मृती मंधाना (कर्णधार), शफाली वर्मा (उपकर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), जी कमलिनी (विकेटकीपर), निकी प्रसाद, हरमनप्रीत कौर, अनुष्का शर्मा, दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, श्रीचरणी, नंदनी शर्मा, क्रांती गौड, अरुंधती मनीता रेड्डी, मिनिमनी रेड्डी. झिम्बाब्वे महिला संघ: जोसेफिन एनकोमो (कर्णधार), चिएड्झा धुरुरु (विकेटकीपर), मॉडेस्टर मुपाचिकवा (विकेटकीपर), मिशेल मावुंगा, कुडझाई चिगोरा, न्याशा ग्वांझुरा, शार्ने मेयर्स, चिपो मुगेरी-तिरिपानो, तेंदाई माकुशा, प्रियंका चीपारे, ओल्कालिस बिझारे, फ्रेन्चुरे, फ्रेन्चुरे, चिपो मुगेरी नोमवेलो सिबांदा, लॉरिन फिरी.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >