कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय शो 'बिग बॉस २०' हा स्पर्धकांमधील अटीतटीच्या स्पर्धेमुळे आणि घरातील वादांमुळे सतत चर्चेत असतो. बिग बॉस २० जसजसा पुढे सरकत आहे तसे घरातील सदस्यांचे खरे स्वरूप पाहायला मिळत आहे. नुकताच बिग बॉसच्या घरात झालेला वाद चर्चेचा विषय बनला. वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून आलेल्या नकुल धूळ आणि कुशल तंवर म्हणजेच गुल्लू यांच्यात जोरदार वाद झाला. नंतर या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. या सर्व प्रकारानंतर बिग बॉसने कठोर निर्णय घेत नकुलला घरातून बाहेर काढलं. आता शोमधून आणखी एका स्पर्धकाला बाहेर काढण्यात आलं आहे.
'बिग बॉस २०' मधून या आठवड्यात आणखी एक स्पर्धक घराबाहेर गेला आहे. या आठवड्यात ११ स्पर्धक नॉमिनेट झाले होते, तर काल घरातील सदस्यांनी रेशनच्या नावाखाली अरिशफा खानची लाईफलाईन काढून घेतली. यामुळे ती संतापली आणि घरातील सदस्यांशी भांडताना दिसली. यानंतर आता काही मीडिया रिपोर्टनुसार अमन गांधी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे.
चित्रपट क्षेत्रात अनेकदा असं होतं की एखादा कलाकार असे चित्रपट नाकारतो जे पुढे जाऊन यशस्वी होतात. मात्र त्यानंतर त्या कलाकाराला आपल्या निर्णयाचा ...
या आठवड्यात आम्रपाली दुबे आणि मनीष गोयल वगळता घरातील सर्व सदस्यांना या आठवड्यात घराबाहेर काढण्यासाठी नॉमिनेट करण्यात आले होते. मनीष नुकताच शो मध्ये आल्यामुळे त्याला नॉमिनेशनच्या शर्यतीतून बाहेर ठेवण्यात आलं होतं. नॉमिनेशनचा फटका हा अमन गांधीला बसला. घरातील सदस्यांनी त्याला चांगलंच सुनावलं आणि नॉमिनेट केलं. ही माहिती मीडिया रिपोर्ट्सनुसार समोर आली असून अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.