'ते' दोन चित्रपट नाकारल्याचा नेहाला होतोय पश्चात्ताप, स्पष्टच म्हणाली...

चित्रपट क्षेत्रात अनेकदा असं होतं की एखादा कलाकार असे चित्रपट नाकारतो जे पुढे जाऊन यशस्वी होतात. मात्र त्यानंतर त्या कलाकाराला आपल्या निर्णयाचा पश्चाताप होतो. अभिनेत्री नेहा धुपियासोबत देखील असंच काहीसं घडलं. अभिनेत्री नेहा धुपियाने संगितलं की तिला शाहरुख खानच्या 'चक दे इंडिया' या सुपरहिट चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती, पण तिने ती नाकारली. याशिवाय तिला 'ऑपरेशन सफेद सागर' या वेब सिरीजचीही ऑफर आली होती. हे दोन मोठे प्रोजेक्ट्स गमावल्याचा पश्चाताप होत असल्याचे नेहाने सांगितले आहे.


नुकत्याच एका चॅट शो दरम्यान नेहाने खुलासा केला की, तिच्या कारकिर्दीत तिने काही उत्तम संधी गमावल्या. आज काही निर्णयांवर विचार करताना आपण महत्त्वपूर्ण संधी गमावल्याचं लक्षात येतं, असे नेहा यावेळी म्हणाली. 'कधी कधी जेव्हा तुम्ही नाकारलेल्या संधींचा विचार करता, तेव्हा तुमच्या लक्षात येतं की तुम्ही काय गमावलं आहे. 'चक दे इंडिया' आणि 'ऑपरेशन सफेद सागर' या अशाच दोन संधी आहेत ज्यांचा मला पश्चाताप होतो. मला नेहमीच एक चांगला क्रीडापट आणि एक लष्करी चित्रपट करायचा होता, पण या दोन्ही मोठ्या संधी माझ्या हातून निसटून गेल्या.' अशी खंत नेहाने व्यक्त केली.



२००७ मध्ये प्रदर्शित झालेला आणि यश राज फिल्म्स निर्मित 'चक दे इंडिया' हा एक अत्यंत गाजलेला क्रीडापट होता. कबीर खानच्या भूमिकेत असलेला शाहरुख खान महिला क्रिकेट संघाला विजयाकडे नेण्यासाठी अथक प्रयत्न करतो. तर 'ऑपरेशन सफेद सागर' ही सिरीज यावर्षी प्रदर्शित झाली आणि प्रेक्षकांकडून तिला प्रचंड प्रशंसा देखील मिळाली. ही सिरीज १९९९ च्या कारगिल युद्धातील भारतीय हवाई दलाच्या भूमिकेवर आधारित आहे. नेहाला हे दोन्ही प्रोजेक्ट्स नाकारल्याचा पश्चात्ताप होतो आहे.

Comments
Add Comment

Sita As A Warrior : 'रामायण' चित्रपटाच्या नव्या प्रोमोत साई पल्लवीचा धडाकेबाज ॲक्शन अवतार; प्रेक्षकांनी मानले दिग्दर्शकाचे आभार

मुंबई : रणबीर कपूर, (Ranbir Kapoor) यश (Yash) आणि साई पल्लवी (Sai Pallavi) यांची प्रमुख भूमिका असलेला 'रामायण' (Ramayan) हा चित्रपट सध्या

Kareena-Saif Love Story : ...तर माझे किती पैसे वाचले असते, करीनाला असं का म्हणाला सैफ अली खान ?

Kareena And Saif : बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांमध्ये करीना कपूर आणि सैफ अली खान यांचे नाव आवर्जून घेतले जाते. लग्नाला १४

Ujjwal Nikam: "त्याला पाहून दोन थोबाडीत...", ललित प्रभाकरला पाहून सरकारी वकील उज्ज्वल निकम असं का म्हणाले?

राजकुमार रावचा ‘प्रहार द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ हा सिनेमा 16 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला असून या

Salman Khan: 60व्या वर्षीही भाईजानचा दबदबा कायम! सलमानच्या वक्तव्याने वेधलं लक्ष जाणून घ्या भाईजान असं म्हणाला तरी काय?

सलमान खानने गेलया तीन दशकांहून अधिक काळ 'भाईजान' म्हणून बॉलीवूड विश्वात अधिराज्य गाजवले आहे. ९० च्या दशकात ऍक्शन

भूतकाळ आणि वर्तमानाचा रहस्यमय खेळ! ‘संडे १९९६’चा ट्रेलर प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे अभिनेते गणेश यादव, पंकज विष्णू आणि ओंकार राऊत

Kavya Maran : संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रकर आणि काव्या मारन अडकणार लग्नबंधनात; २१ नोव्हेंबर रोजी चेन्नईत पार पडणार विवाह सोहळा

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रकर (Aniruddha Ravichandran) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH)