भूतकाळ आणि वर्तमानाचा रहस्यमय खेळ! ‘संडे १९९६’चा ट्रेलर प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे अभिनेते गणेश यादव, पंकज विष्णू आणि ओंकार राऊत हे तीन दमदार कलाकार ‘संडे १९९६’ या रहस्यमय मराठी चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. येत्या ३० ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्यातून समोर आलेलं गूढ वातावरण, कोकणाची अनोखी पार्श्वभूमी आणि काळाशी जोडलेलं रहस्यमय कथानक यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. व्ही आर. के. फिल्म्स निर्मित या चित्रपटाची निर्मिती नीलांबरी विक्रांत यांनी केली असून, लेखन आणि दिग्दर्शन जीवन राजेंद्र चव्हाण यांचे आहे.


कधी काळाचं चक्र उलटं फिरतं, कधी भूतकाळ वर्तमानाचा पाठलाग करू लागतो… आणि मग सुरू होतो नात्यांचा, भावनांचा आणि अनुत्तरित प्रश्नांचा गुंतागुंतीचा खेळ! याच रहस्यमय वळणांवर उलगडत जाते ‘संडे १९९६’ची थरारक कहाणी. भूतकाळ आणि वर्तमानाच्या सीमारेषेवर अडकलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधणारा हा प्रवास अनेक अनपेक्षित घटनांनी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणार आहे.



गणेश यादव, पंकज विष्णू आणि ओंकार राऊत या तीनही कलाकारांनी आपल्या आजवरच्या कामातून अभिनयाची वेगळी छाप उमटवली आहे. ‘संडे १९९६’मध्ये हे कलाकार कोणत्या व्यक्तिरेखांमधून प्रेक्षकांसमोर येणार? त्यांच्या भूमिकांचा कथानकाशी नेमका काय संबंध असणार? आणि घटनांना कोणतं अनपेक्षित वळण मिळणार? हे जाणून घेण्याची उत्सुकता ट्रेलरमुळे अधिकच वाढली आहे. चित्रपटात या तिघांसह सुनील गोडबोले, शिवानी बने, सायली पाचपुते आणि गौरवी महांगडे यांच्या भूमिका आहेत.


या चित्रपटाची कथा आणि तिची गूढ मांडणी सुरुवातीपासूनच मला भावली. कोकणाची पार्श्वभूमी, कथानकातील अनपेक्षित वळणं आणि कलाकारांचा प्रभावी अभिनय यांमुळे हा चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवेल, असा विश्वास निर्मात्या नीलांबरी विक्रांत यांनी व्यक्त केला. ‘संडे १९९६’मध्ये प्रत्येक घटना, प्रत्येक नातं आणि प्रत्येक वळणामागे एक रहस्य दडलं आहे. प्रेक्षकांनी केवळ पडद्यावर घडणाऱ्या घटना पाहू नयेत, तर त्यामागचे धागेदोरे जोडत या गूढ प्रवासाचा भाग व्हावं, अशी माझी इच्छा आहे. प्रत्येक उत्तरातून नवा प्रश्न निर्माण करणारी आणि शेवटपर्यंत उत्कंठा कायम ठेवणारी ही कथा प्रेक्षकांना नक्कीच एका वेगळ्या अनुभवातून घेऊन जाईल असं लेखक-दिग्दर्शक जीवन चव्हाण यांनी सांगितलं. कोकणाच्या निसर्गरम्य सौंदर्याला गूढतेची किनार लाभलेल्या या कथेतून रहस्य, भावभावना आणि थरार यांचा अनोखा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे.

Comments
Add Comment

Salman Khan: 60व्या वर्षीही भाईजानचा दबदबा कायम! सलमानच्या वक्तव्याने वेधलं लक्ष जाणून घ्या भाईजान असं म्हणाला तरी काय?

सलमान खानने गेलया तीन दशकांहून अधिक काळ 'भाईजान' म्हणून बॉलीवूड विश्वात अधिराज्य गाजवले आहे. ९० च्या दशकात ऍक्शन

Kavya Maran : संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रकर आणि काव्या मारन अडकणार लग्नबंधनात; २१ नोव्हेंबर रोजी चेन्नईत पार पडणार विवाह सोहळा

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रकर (Aniruddha Ravichandran) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH)

BMC Action: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्यावर BMC चा हातोडा, नेमकं कारण काय?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या जुहू येथील बंगल्यामुळे चर्चेत आला आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC)

Dhanush-Mammootty Movie : धनुष आणि ममूटी पहिल्यांदाच एकत्र झळकणार ? ‘OM: Chapter 1’ चित्रपटाची चर्चा, रिलीज डेट आली समोर

Dhanush-Mammootty Movie : दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार एकाच चित्रपटात पाहायला मिळणार असल्याच्या चर्चेने

Yo Yo Honey Singh : 'यो यो हनी सिंग'च्या अडचणीत मोठी वाढ! आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलचा मोठा दणका

प्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार हिरदेश सिंग, ज्यांना जगभर 'यो यो हनी सिंग' (Yo Yo Honey Singh) या नावाने ओळखले जाते, त्यांच्यामागील

Prime Video Chaar Yaar : प्राइम व्हिडिओच्या ‘चार यार’चा ट्रेलर प्रदर्शित; २००० च्या दशकातील मुंबईत उलगडणार गुन्हेगारी आणि मैत्रीची अनोखी कहाणी!

एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल्ससाठी ओळखली जाणारी भारतातील आघाडीची स्ट्रीमिंग सेवा प्राइम व्हिडिओने आज आपल्या आगामी